क्रांतिवीर शाळेच्या च्या आट्यापाट्या संघाची राज्यस्तरासाठी निवड

Spread the love

राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झालेला क्रांतिवीर शाळेचा संघ

क्रांतिवीर शाळेच्या च्या आट्यापाट्या संघाची राज्यस्तरासाठी निवड

म्हसवड … प्रतिनिधी
म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड च्या 14 वर्षे वयोगटातील खेळाडूंनी कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने या संघाची राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मौजे मिणचे जिल्हा कोल्हापूर येथे 14 वर्षे वयोगटातील विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी शिक्षण विभाग कोल्हापूर अंतर्गतचे अनेक संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात क्रांतिवीर शाळेच्या खेळाडूचा समावेश असणाऱ्या सातारा संघाने सांगली संघावर यशस्वी मात करून प्रथम क्रमांक पटकाविला. पुढील राज्य स्तरीय आट्यापाट्या स्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहेत .
यशस्वी संघातील खेळाडूंचा तपशील पुढील प्रमाणे ..जयदीप चव्हाण.. संघनायक , कुणाल खांडेकर ,समर्थ शितोळे ,संघर्ष काळे, शुभम शिंदे, यशराज शिंदे ,संयम दिङवाघ, विराज शिंदे ,मिहीर काटकर, मयुरेश काळे, कृष्णराज सावंत ,श्रेयश काटकर, तुषार घुटुकडे.
क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे व चंद्रकांत तोरणे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर संस्था उपाध्यक्ष अँडवोकेट इंद्रजीत बाबर ,सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबऱ, सातारा जिल्हा आट्यापाट्या संघाचे सचिव ज्ञानेश काळे, सांगली जिल्ह्याचे सचिव नामदेव शिंदे, क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील शिक्षक, पालक इत्यादी मान्यवरांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!