
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
शांत निवांत शिशिर सरतो, सळसळता हिरवा वसंत येतो कोकिळेचा सुरांसोबत चैत्र पाडवा उगवतो!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला
गुढीपाडवा म्हणजे नवीन मराठी वर्षाची सुरुवात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून आणि प्रभु श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला तेव्हा लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुढ्या उभारल्या होत्या.
अनेक चालीरीती, परंपरा या सणाशी जोडल्या गेलेल्या आहेत.
पूर्वी संस्थान असलेल्या औंध येथे आजही आगळ्यावेगळ्या परंपरेप्रमाणे, ऐतिहासिक वारसाने गुढीपाडवा साजरा करण्यात येतो.संस्थान काळाच्या आधीपासून गावात देशमुखांकडे गाव पाटीलकी होती गाव कारभारही त्यांच्याकडेच असायचा. गुढीपाडव्याच्या दिवशी औंध गावातील पाटीलकी असणारे देशमुख कुटुंबीय व गावातील सर्व लोक यमाई देवीच्या मंदिरात दुपारी बारा वाजता एकत्र व्हायचे, तिथे देवी ला लिंब दिला जायचा, पंचांग वाचन व्हायचं ,पाऊस-पाण्याचा विषय व्हायचा, तदनंतर तो लिंब वाजत गाजत देशमुख गल्लीतील गाव पारावर आणला जायचा गुढीचा नैवद्य म्हणून कडुनिंबाची कोवळी पाने ,गूळ ,साखर, मिरे ,जिरे ओवा, हिंग, मीठ यांचे मिश्रण वाटून एकजीव करून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद दिला जायचा. तो यासाठी की वर्षाची,दिवसाची किंवा आयुष्याची सुरुवात जरी कडू झाली तरी शेवट गोड व्हावा हा संदेश यातून मिळायचा. तिथे गावातील ज्यांचे न्याय निवाड्याचेप्रश्न आहेत ते सर्व लोक जमा व्हायचे, सर्व समाजातील लोकांची उपस्थिती असायची. गावातीलच लोक गावातील वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करायचे. भांडण तंटे आपसात मिटविले जायचे, नवीन संकल्प केले जायचे, शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न सोडवले जायचे, बारा बलुतेदार यांचे देणे-घेणे याविषयी चर्चा व्हायची,कामाचे दर ठरवले जायचे, गावात करावयाच्या वेगवेगळ्या योजना सांगितल्या जायच्या,यात्रेचे नियोजन केले जायचं. असे वेगवेगळे विषय घेऊन पारावर मोठी चर्चा भरायची गावाच गावाचा कारभार करायचा .
रविवारी गुढीपाडव्यानिमित्त औंध येथील सर्व ग्रामस्थांनी हिच परंपरा व संस्कृतीजपत मागील आठवणींना व परंपरेला उजाळा दिला. हे सर्व चिरंतन राहावं अशी सर्व सर्व ग्रामस्थांनी अशा व्यक्त केली
या कार्यक्रमासाठी दिपक नलवडे,शामपूरी महाराज,गावचे पाटील श्री.जानकर,औंधसह सोळा गावासाठी अहोरात्र झटनारे जलयोद्धे दत्ताभाऊ जगदाळे,बाळासाहेब देशमुख, अशोक यादव,राजूबापू देशमुख ,.गणेश देशमुख,हर्षद देशमुख,अंबादास बुटे गणेशशास्त्री ईगळे गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.