
गोंदवले – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्य खात्याचे कॅबिनेट मंत्री मा.ना.जयकुमार गोरे-भाऊ यांचे शुभ हस्ते यावेळी महाराष्ट्र राज्यात नामांकित असलेल्या चैतन्य करिअर ॲकेडमी दहिवडीच्या वतीने संस्थेच्या अठराव्या वर्धापनदिना निमित्त विविध क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्तुंग असे कार्य करणारे सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांना नुकतेच चैतन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारात त्यांना चैतन्य पुरस्काराचे मानपत्र,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,मानाचा फेटा आणि पुष्पहार देऊन मंत्री महोदय मा.ना.जयकुमार गोरे -भाऊ यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले. सतेशकुमार माळवे सरांनी आपल्या आजवरच्या अठ्ठावीस वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत विद्यार्थ्यांनाच्या गुणवत्तावाढ आणि विकासाठी अनेक प्रयोग व उपक्रम राबविले आहेत.त्यांचा एक कुशल, कार्यक्षम आणि कर्तबगार शिक्षक म्हणून नावलौकिक आहे.आतापर्यंत त्यांचे बरेचसे विद्यार्थी अनेक क्षेत्रात व स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन चमकले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच त्यांना हा चेतना देणारा चैतन्यदायी पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
यावेळी मंत्री महोदयांच्या व्यतिरिक्त अन्य काही मान्यवर पाहुणेही उपस्थित होते.यामध्ये माजी आमदार मा.दिलीपराव येळगावकर,सातारा जि.प.चे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती ॲड.भास्करराव गुंडगे,सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ.राजेंद्र खाडे,माणचे माजी सभापती मा. अतुलदादा जाधव,माण-खटावच्या प्रांताधिकारी मा.उज्जवला गाडेकर, माणचे तहसीलदार मा. सचिन अहिर,गट विकासाधिकारी मा.प्रदिप शेंडगे,पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,मा.संजय गांधी,चैतन्य करिअर ॲकेडमीचे संस्थापक मा.सदाशिव खाडे,मेडिकल कंपनी झोनल ऑफिसर मा.दत्तात्रय खाडे,चैतन्य करिअर ॲकेडमीचे चालक मा.संदीप खाडे, ॲड.दत्तात्रय हांगे,नंदकुमार खोत, धामणी सरपंच मारुती खाडे,गोंदवले बु सरपंच जयप्रकाश कट्टे,ॲड.अमृत खाडे,संग्राम खाडे,लालासो ढवाण,गुलाबराव कट्टे,माण-खटाव तालुक्यातील अनेक पत्रकार बंधू व पोलीस पाटील बंधू -भगिनी,आरोग्य कर्मचारी आणि ॲकेडमीतील बहुसंख्य विद्यार्थी आदि मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती.
छाया – मान.ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते सतेशकमार माळवे यांचा सत्कार
( विजय ढालपे)