म्हसवड पोलीसांची संशयास्पद कामगिरी, बनसोडे करणार उपोषण

Spread the love

माणदेशी न्यूज

इंदापूरच्या भोंदूबाबाने आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिकाला घातला गंडा

प्रतिनिधी सातारा

इंदापूरच्या भोंदूबाबाने आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिकाला घातला गंडा घातला आहे
माण तालुक्यातील देवापूर गावचे कांता वामन बनसोडे हे सेवानिवृत्त आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपीक आहेत.
ते मंगेश भागवत या एका भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले. त्या भोंदू बाबाने पैशाचा पाऊस पाडुन देतो, अशी बतावणी करुन तब्बल ३६ लाख रुपयांना फसवले असून त्या भोंदू बाबाला म्हसवड पोलीस अभय देत आहे.
त्यामुळे न्यायासाठी म्हसवड पोलीस ठाण्याच्या दारातच बनसोडे हे ६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत.

बनसोडे हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथून कनिष्ठ लिपीक या पदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेती करतात. त्यांचे मित्र सर्जेराव वाघमारे हे मायाक्का देवीचे पुजारी असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे मित्र मंगेश भागवत (रा. कळंस, ता. इंदापूर) हे पैशाचा पाऊस पाडून देतात. त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, अशी बतावणी करून त्यांच्याकडे २ एप्रिल २०२३ रोजी घेऊन गेले. भागवत याने त्यासाठी पुजेचे साहित्य आणण्याकरता ऑनलाईन व ऑफलाईन अशी ३६ लाख रुपयांची रक्कम घेतली.
त्यावेळी हरीभाऊ काटकर, काशिनाथ शेलार, सुनील धोत्रे, आनंदा पिंपळदरे यांनाही वाघमारे याने बोलवून घेतले. त्यांच्यापैकी काटकर यांनी २ लाख, पवार यांनी ४ लाख, धोत्रे यांनी २ लाख आणि पिंपळदरे यांनीही ८ लाख रुपये दिले.कांता बनसोडे हे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी भागवतच्या घरी गेले. त्यांच्या घरात काळुबाईच्या देवीसमोर सहा बंदिस्त बॉक्स बनसोडे यांना देऊन त्यात ३० कोटी रुपये आहेत. ते २१ व्या दिवशी उघडा असे त्याने सांगितल्याने २१ व्या दिवशी बॉक्स उघडल्यावर त्यातून पेपरची रद्दी निघाली. मग बनसोडे यांनी फोन करुन भागवत आणि वाघमारे
यांना यानंतर त्यांना पैसे मागितले असता त्यांनी टाळाटाळ केली अखेर ,६ मार्च २०२४ पासून पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यावरुन म्हसवड पोलीस ठाण्यात २ ऑगस्ट रोजी लेखी तक्रार दाखल केली. परंतु त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही.
म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी बिराजदार आणि वाघमोडे यांनी भागवत याच्याशी हातमिळवणी केल्याचे समजते. त्यामुळे न्यायासाठी ६ जानेवारी रोजी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!