दहिवडी वार्ताहर —
मलवडी तालुका माण येथील श्री राम ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून रात्री वेळी अज्ञात चोरांनी सुमारे 65 हजारांचा सोनं चांदी चे दागिने चोरुन नेले..
अधिक माहिती अशी.
दिनांक 04/12/2024 रोजीचे सायंकाळी 7.30 ते दिनांक 05/12/2024 रोजी सकाळी 6.00 वाजणेचे दरम्याण मौजे मलवडी ता.माण गावचे हद्दीतील श्रीराम ज्वेलर्सचे दुकानाचे शटरचे व ग्रीलचे कुलुप कशाचे तरी साहाय्याने तोडुन दुकानातील सोन्याचे झुमके, टॉप्स व बदाम असे साडे सात ग्रॅम वजणाचे व चांदीचे पैंजण, जोडवी, बीचव्या, कडली, व वाळे असे मोडीस घेतलेले 500 ग्रॅम वजणाचे दागिने असे एकुण 65,000/- रुपये किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरला अशी फिर्याद नितीन गोपाळ गोरे यांनी दहीवडी पोलीसात दिली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.फौ. पी.जी.हांगे हे करीत आहेत.