क्रांतिवीर शाळेत परसबागेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती.

Spread the love

म्हसवड… प्रतिनिधी
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे विद्यार्थ्यांनी विविध फळभाज्या व पालेभाज्या लागवडीच्या माध्यमातून परसबाग फुलवली असून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी खारीच्या वाट्याने यशस्वी प्रयत्न केलेला आहे.
म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा ही या परिसरातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. आजवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने जिल्हा तसेच राज्यस्तरावर आपला नावलौकिक दाखवून दिलेला आहे. या शैक्षणिक वर्षातील खरीप हंगामात शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा कंपाऊंडच्या आतील बाजूला विविध फळभाज्या तसेच पालेभाज्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. शालेय पोषण आहारासाठी या उपक्रमातून उत्पादित होणाऱ्या विविध भाज्या उपयोगी ठरत आहेत. रोजच्या पोषण आहाराच्या माध्यमातून उत्पादित भाज्या विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये वापरल्या जात आहेत. भाज्याच्या उपयुक्तते बरोबरच परसबागेची ओळख, कृषी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन च्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना होत आहे. भाजीपाल्याची योग्य स्थितीत काढणी तसेच प्रक्रिया याबाबत ही विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे.
संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत परसबागेचा यशस्वी उपक्रम राबवलेला आहे. क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, यांनी शिक्षक, व विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबागेत दुधी भोपळा, दोडका, पावटा ,कोथिंबीर, घेवडा, पालक, कांदा, वांगी, मिरची, टोमॅटो, शेवगा, कडीपत्ता इत्यादी फळभाज्या व पालेभाज्या ची लागवड यशस्वीरित्या केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!