सातारा जिल्ह्यात पावणे पाच लाख वाहनांना एच.एस.आर.पी. नोंदणी पूर्ण….

Spread the love


(अजित जगताप )
सातारा दि: महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे नोंदणी क्रमांक अद्यावत करण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत. सदर एच एस आर पी नोंदणी करण्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शेवटची मुदत असल्याची माहिती सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान १५ ऑगस्ट नंतर वाहनांवर एच एस आर पी नोंदणी नसल्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. याची नोंद घेण्याची माहिती दिली आहे.

सातारा जिल्हा परिवहन विभागाच्या वतीने दिनांक ३१ मार्च २०१९ पूर्वी चार लाख सत्तर हजार ७९७ वाहनांना एच एस आर पी नोंदणी केल्याची माहिती सातारा उपप्रादेशक परिवहन कार्यालयातील मिळाली आहे.
सातारा येथील परिवहन कार्यालयात ३१ जुलै २०२५ पर्यंत एक लाख ७० हजार २०६ वाहनांना एच एस आर पी बसवण्याची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी एक लाख ११ हजार ४५ दुचाकी वाहनांना एच एस आर पी नोंदणी करण्यात आली आहे. हे काम गतीने सुरू असून ज्या वाहनचालकांनी आपल्या वाहनाची नंबर प्लेट नोंदणी करणे गरजेचे आहे. दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पासून एचएसआरपी ऑर्डर बाबत दंडात्मक कारवाई केली जाईल. ही कारवाई टाळण्यासाठी वाहन चालकांनी तातडीने एचएसआरपी नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी केले आहे.


फोटो– सातारा उप प्रादेशिक कार्यालय सातारा शहर (छाया– अजित जगताप सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!