मायणी प्रतिनिधी—स्फूर्ती शिक्षण मंडळ संचलित हुतात्मा भगतसिंग प्राथमिक विद्यालय व अनंत इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालय पुणे येथील इन्फोसिस कंपनी संलग्नित स्पर्श फाउंडेशन तर्फे 27 संगणक संच भेट देण्यात आले या सर्व संगणकाचा लोकार्पण सोहळा असंख्य पालकांच्या उपस्थितीत शनिवारी शनिवारी पार पडला या पालक मेळाव्याला खटावचे मानचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ उर्मिला येळगावकर, सौ नंदा चन्ने, सौ पल्लवी गुदगे, सौ मानसितोरो, अभिजीत कचरे, आनंदा शेवाळे, श्री राजाराम कचरे, किरण जाधव, प्राध्यापक दिलीप पुस्तके, प्रमुख उपस्थिती होती पालक वर्गातून मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र येलमर यांची निवड करण्यात आली आपल्या प्रास्ताविक भाषणात बरकत शेख सर यांनी शाळेत चालू असलेली उपक्रम, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा, याविषयी पालकांना सविस्तर माहिती दिली तर शेखर देशमुख सर यांनी सहशाले उपक्रम याविषयी माहिती दिली यावेळी इयत्ता आठवी मधील शिष्यवृत्तीधारक व एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या श्रेयस विजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी सचिन गणेश सुधरे यांनी मी शाळेचा विद्यार्थी असून आता इंजिनियर झालो आहे कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवाची बुद्धिमत्ता ही श्रेष्ठ असते आपले बौद्धिक कसे वाढवावे अभ्यासा करावा यश कसे संपादन करावी याविषयी त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केली त्याचाही सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप येळगावकर आपल्या भाषणात म्हणाले सध्याचे स्पर्धेचे युग आहे बालपणात शैक्षणिक पाया भक्कम झाला पाहिजे यासाठी शिक्षक दडपडत आहेत आता काय आता शाळेत संगणक आले आहेत याच संगणक सोबत आता कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत मातृभाषेतून शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांशी लक्षणीय प्रगती होते त्यामुळे आता आम्ही कॉलिटी ला महत्व देत असून कॉलिटी वाढली की क्वांटिटी वाढते क्वालिटी जर चांगली असेल तर विद्यार्थी कोठूनही शाळेला येतात भौतिक सुधारणा सोबत गुणवत्ता , शिस्त, व संस्कार घडवण्याचे काम आमच्या शाळेत घडत आहे यावेळी पालक सभेचे अध्यक्ष राजाराम येलमर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या पालक मेळाव्यास सुभाष बाबुराव सो मदे, विजय देशमुख , महादेव दामोदर, संगीता वसंत जाधव, पुंडलिक सकट, अजित काबुगडे, राजेंद्र एलमर, हेमंत बामणे, भास्कर चौगुले, अनिता पाटोळे, तसेच शिक्षक पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सुनील एल्मर मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार मानले
हुतात्मा भगतसिंग व अनंत इंग्लिश स्कूल ला 27 संगणक भेट

Leave a Reply