साताऱ्यात आ.भोसले यांचे अभिनंदन फलक तर श्री कदम यांना विजयाचा विश्वास

Spread the love


(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात ६३.५३ टक्के मतदारांनी मतदान केलेले आहे. आज मतमोजणी असून महायुतीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी मतमोजणीच्या पूर्वसध्येलाच अभिनंदन फलक लावले आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमित जी कदम यांनी विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
बुधवार दि:२० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या वेळेला मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये जनजागृती झाल्यामुळे मतदान केंद्रावर बऱ्यापैकी गर्दी दिसून येत होती. महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्येक गावामध्ये एजंट व बूथ उभारणी केली होती. त्याच पद्धतीने अमित जी कदम यांनी सुद्धा प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिंग एजंट व बुध मध्ये कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या. निवडणुका म्हणजे स्थानिक पातळीवर असणाऱ्या राजकीय संघर्षाचेही बीज यावेळी पाहण्यास मिळाले. महत्वाच्या गावामध्ये एकाच गटातील चार बूथ तसेच आपण केलेल्या मतदानामुळे स्थानिक पातळीवर नेत्यांचा गौरव होणार आहे .म्हणून काहींनी अंतर्गत राजकीय खेळी केली आहे. त्याचाही नेमका फायदा कोणाला होईल ? हे सुद्धा स्पष्ट होणार आहे.
सातारा शहरांमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राजकीय एकमत झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. तरी आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार? याचा सुद्धा आता फेसला होणार आहे. त्यामुळे अंतर्गत खेळी व डावपेच पहाण्यास मिळणार आहे. महायुतीचे भाजप उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना गेल्या वेळेला ४३,४२४ मताधिक्य मिळाले होते. यंदा ते वाढवण्यासाठी समर्थकांनी प्रयत्न केले आहे. परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार अमित जी कदम यांनी सुद्धा प्रचार यंत्रणेमध्ये चांगली आघाडी घेतली. त्यांचे मशाल चिन्ह सर्वत्र पोहोचवण्यास त्यांना यश आले आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा विजयाची खात्री वाटत आहे.
दोन लाख २९ हजार ४८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. हे मतदान कमळ की मशाल आणि इतर उमेदवारांच्या मतदानामुळे काय फरक पडणार आहे. हे सुद्धा स्पष्ट होणार आहे.
तत्पूर्वीच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभिनंदनचे फलक सातारा शहरात काही मोक्याच्या ठिकाणी लागले आहेत. वास्तविक पाहता आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारामध्ये अनेक जण सहभागी झाले होते .त्यांनी पदयात्रेतही स्वतःला झोकून दिले होते. परंतु ,काही महाभाग प्रचारात नसताना शायनिंग करण्यासाठी फलक लावत असल्याचे उघड उघड चर्चा महायुतीतील काही समर्थक करू लागलेले आहेत. महाविकास आघाडीने एकसंघरित्या प्रचार केला की नाही? याची चर्चा सुरू झालेली आहे.

—————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!