दुचाकीचा भार, व्यापार्यांचे हाल, अठवडा बाजारातील बोलके चित्र

म्हसवड दि. १
माण तालुक्यात सर्वात मोठा अठवडी बाजार म्हसवड या शहरात भरतो या अठवडी बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने शहराच्या अर्थकारणास यामुळे मोठी मदत होत आहे, असे असले तरी सध्या हा अठवडा बाजार दुचाकीमुळे वेगळ्याच चर्चेत आला असुन अठवडी बाजारातील दुचाकींच्या गर्दीमुळे बाजारसाठी जागा अपुरी पडु लागल्याचे चित्र आहे.
म्हसवडसह पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी व नागरीकांसाठी येथील अठवडी बाजार हा अतिशय महत्वाचा आहे, या बाजारवरच शहराचे अर्थकारण सुरु आहे या शिवाय येथील छोट्या, छोट्या व्यावसायिकांनाही याचाच खुप मोठा आधार आहे, माण तालुक्यात सर्वात मोठा अठवडी बाजार म्हणुनही म्हसवड शहरात भरणार्या अठवडी बाजारची विशेष ओळख आहे. हा अठवडी बाजार पालिका इमारतीसमोरील बाजार पटांगण याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरतो, तर बस स्थानक चौक ते विठ्ठल – रुक्मिणी मंदिर या दरम्यानच्या रोडवरीही मोठ्या प्रामाणावर छोटी, छोटी दुकाने अनेकजण लावत असतात, मात्र या दरम्यानच्या रस्त्यावर अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात त्यामुळे बुधवार म्हटले की येथे वाहतुक कोंडी ही ठरलेली असते, वाहतुक पोलीसही कोणीतरी फोन केल्यावर याठिकाणी येवुन ती वाहतुक कोंडी सोडवतात मात्र तो पर्यंत वाहतुक कोंडींंमुळे होणारे धुराचे प्रदुर्षण व कर्नकर्कश्य हॉर्नमुळे बाजारातील सर्वजणच हैरान होतात, तर दुचाकींची संख्या याठिकाणी मोठी असुन येथील अठवडी बाजारात येणारे छोटे, छोटे व्यापारी हे ज्या जागेत आपली दुकाने लावतात त्याच ठिकाणी आपली दुचाकी व चारचाकी वाहने लावत असल्याने इतर छोट्या व्यावसायिकांना आपली दुकाने लावण्यासाठी जागा शिल्लक रहात नाही, परिणामी अनेक शेतकर्यांना बाजारात जागा न मिळाल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजी पाला बड्या व्यापार्याला विकावा लागतो. या अठवडी बाजारात जर याच परिसरातील शेतकर्यांना जागा उपलब्ध होत नसेल तर ही मोठी खेदाची बाब आहे, यासाठी पालिका प्रशासनाने गंभीरपणे पाऊले उचलुन एक ही दुचाकी बाजार तळावर लावु देवु नये तर मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होणार नाही याची खबरदारी पोलीसांनी घेतल्यास निश्चितच म्हसवड शहराचा अठवडी बाजार हा आदर्श बाजार भरेल यासाठी पालिका प्रशासनाची व पोलीस प्रशासनाची मानसिकता फार महत्वाची आहे.

फोटो –