
पंढरपूर (वार्ताहर)–
लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभाग पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे खराडे, पोलीस उपअधीक्षक श्री. गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गणेश पिंगुवाले यांच्या पथकाची दमदार कामगिरी….
नगरपालिका स्वच्छता ठेका देण्यासाठी एक लाख ९५ हजार रुपये लाच मागणारे अकलूज नगरपालिका कर्मचारी नितीन सिद्राम पेटकर, वय 40 वर्षे, पद – स्वच्छता निरीक्षक, अकलूज नगरपरिषद, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर, रा. अक्कलकोट, जि. सोलापूर. हा अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकला.
अकलूज नगरपरिषदेने शहरातील साफसफाई करणे कामी मनुष्यबळ पुरवठा करणे करिता प्रसिद्ध केलेले टेंडर तक्रारदार यांच्या संस्थेस मिळाले होते, त्याप्रमाणे तक्रारदार यांनी मनुष्यबळ पुरवठा केला होता, यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतन बिल काढण्यासाठी वेतन बिलाच्या 3 टक्के रक्कम व वर्क ऑर्डर दिल्याचा मोबदला 1,50,000/- रुपये असे एकूण 1,95,000/- रु. लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी यांचेशी संपर्क करुन संबंधित लाचखोर कर्मचारी नितीन पेटकर यांस रंगेहाथ पकडले आहे.
पर्यवेक्षण अधिकारी :- श्री. गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. सोलापूर.
➡ मार्गदर्शन अधिकारी :-
श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.
डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. यांचे मार्गदर्शन लाभले.. गणेश पिंगुवाले, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर.
पोलीस अंमलदार एएसआय/कोळी,
पोह/नरोटे व चालक पोह/ राहुल गायकवाड सर्व नेमणूक लाप्रवि, सोलापूर.
यांनी या कारवाईत भाग घेतला होता.