▪️ कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आतीषबाजीत एकच जल्लोष

Spread the love

वडूज नगरपंचायत प्रभारी नगराध्यक्षपदी सोमनाथ जाधव …
▪️ कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आतीषबाजीत एकच जल्लोष

वडुज , दि. २९ येथील नगरपंचायत नगराध्यक्षा पदाचा रेश्मा बनसोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागे वरती उपनगराघ्यक्ष सोमनाथ जाधव यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली .
पार्टी अंतर्गत समजोत्या नंतर उर्वरात कार्यकालासाठी सहा – सहा महिने नगराध्यक्ष निवडीसाठी चिठ्ठी द्वारे निवड करण्यात आली होती . प्रारंभी रेश्मा बनसोडे यांना सहा महिने कालावधी पूर्ण केल्यानंतर उर्वरितांना सधी देण्यासाठी त्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला . पुढील नगराध्यक्ष निवड होई पर्यंत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून सोमनाथ जाधव यांनी कारभार हाती घेतला . खुर्चीवर विराजमान होताच कार्यकर्त्यानी फटाक्यांच्या आतिषबाजीत एकच जल्लोष केला .
यावेळी जिल्हा भाजपा नेते विकल्पशेठ शहा ,खटाव तालुका भाजपा तालुकाघ्यक्ष अनिल माळी , नगसेवक ,बनाजी पाटोळे , सचिन माळी , ओंकार चव्हाण , स्वप्नाली गणेश गोडसे,माजी सरपंच अनिलआण्णा गोडसे, श्रीकांत काळे , प्रतिक बडेकर , आदीसह भाजपा पक्षाच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले की , शहरातील दैनादन सुविधा आणि नागरिकांच्या गैरसोयी होऊ नये म्हणून आपण मिळालेल्या संधीचा प्रामाणीक प्रयत्न करणार .
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र जाधव , माजी उपसरपंच गोंविद जाधव , परेश जाधव , अरविंद जाधव , नारायण जाधव , अशोक जाधव, सनी जाधव, सचीन जाधव , शैलेश जाधव , शामराव जाधव , आकाश जाधव,निलेश जाधव , अविनाश जाधव , साईनाथ जाधव अभिजीत जाधव , शेखर पाटोळे ,ओंकार जाधव , दिनकर जाधव , शंकर जाधव, पिंटू जाधव , राजू जाधव , प्रथमेश जाधव , गंगाराम जाधव धनंजय काळे,आदीनी नगराध्यक्ष सोमनाथ जाधव याचे अभिनंदन केले .

फोटो :
वडूज नगरपंचायत प्रभारी नगराध्यक्ष सोमनाथ जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!