
रांजणी
राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते जलनायक ना.जयकुमार गोरे यांचा भव्य कृतज्ञता सन्मान सत्कार सोहळ्याचे रविवार दि. ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मार्डी गटाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या आंधळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य ते चार वेळा माण मतदारसंघाचे आमदार व सध्या मंत्री या प्रवासात मार्डी गटाने ना. जयकुमार गोरे यांना भरभरून साथ दिली आहे. मंत्री ना.गोरे यांनीही मार्डी गटाला नेहमीच भरघोस मदत केली आहे. आपला माणूस, आपला आमदार, मंत्री झाला याचा आनंद, तसेच मार्डी गटाला दिलेल्या भरीव मदतीबद्दल मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या भव्य सत्काराचे रविवार दि.११ मे रोजी सायंकाळी ६ वा रांजणी येथील ममता स्मृती नानासाहेब दोलताडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे.
ना. जयकुमार गोरे यांनी मार्डी गटासाठी केलेल्या विधायक कामगिरीसाठी व स्थानिक विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा नागरी कृतज्ञता सन्मान सत्कार करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या भागातील रस्ते, पाणी योजना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी घडली असून, या सर्वच कार्यांचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.
यावेळी माण खटाव तालुक्यातील अनेक मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत. तरी या सन्मान सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मार्डी गटाच्या वतीने केले आहे.