
लोणंद (दिलीप वाघमारे):-
मथुरा उत्तरप्रदेश येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट १४ वर्षाखालील मुले/मुली स्पर्धेत छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी लोणंद येथील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले.
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत ज्या मुलांनी यश मिळविले त्या सर्व मुलांचा त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आदरणीय आनंदराव शेळके पाटील मामांनी मुलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.मुंबई संघामधून कुमार संग्राम राजश्री भगवानराव तांबे हा खेळाडू खेळत होता त्याला रौप्यपदक मिळाले. विदर्भ संघामध्ये कुमार रुद्रनील ऐश्वर्या योगेश शेळके पाटील आणि कुमार राजवीर स्वाती प्रताप गोवेकर हे दोन खेळाडू खेळत होते त्यांना कांस्यपदक मिळाले. मुलींचा संघ देखील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मथुरेमध्ये दाखल झाला होता. याच महाराष्ट्र मुलींच्या संघाचा द्वितीय क्रमांक आला व त्यांना रौप्यपदक मिळाले. या मुलींच्या संघामध्ये आपल्या लोणंद गावची कन्या कुमारी श्रेया अंजली पंकज ननावरे या खेळाडूचा सहभाग होता. या खेळाडूंना कुमारी शुभदा झणझणे पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्या स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्वत्र होत आहे. त्यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी माजी समाजकल्याण समिती सभापती मा.आनंदराव शेळके पाटील मामा, लोणंदच्या माजी व प्रथम नगराध्यक्षा सौ.स्नेहलता शेळके पाटील, भाजपा युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील, उद्योजक संग्राम शेळके पाटील तसेच उद्योजक प्रवीण आप्पा ननावरे, डॉ.प्रताप गोवेकर, निर्मला ननावरे,अंजली ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.