नवीन इमारतीचा भूमीपूजन;संस्थेकडून इमारतीसाठी ५१लाखाची मजुंरी.

वावरहिरे- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री पाणलिंग विद्यालयाच्या ४नवीन वर्ग खोल्याचे भूमीपुजन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी कोकण आयक्त श्री प्रभाकर देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव विकास देशमुख, सह सचिव बंडु पवार, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, जनरल बाॅडी सदस्य बबनराव खाडे, वावरहिरे गावच्या सरपंच शैला राऊत, स्कुल कमिटी सदस्य हणमंत पांढरे , विष्णु चव्हाण, उद्योजक अशोक आनेकर,शंकर कचरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री प्रभाकर देशमुख म्हणाले, श्री पाणलिंग विद्यालयातील भुमीपुजन झालेल्या ४नवीन वर्ग खोल्याबरोबर विद्यालयातील सर्व डिझीटल क्लास रुम, त्याचबरोबर सर्व मुलांना कौशल्य आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले जाईल,विद्यालयाला सुसज्ज चांगले क्रिडागंण,उत्तम स्वच्छतागृह निर्माण करुन हे विद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या सातारा विभागात आदर्श बनवू देवू आणि भुमीपुजन झालेल्या चार नवीन वर्ग खोल्याची वास्तु लवकर पुर्ण करुन तिच्या उद्घाटनसाठी संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना आमंञित करु अशी ग्वाही विद्यालयास श्री देशमुख यांनी दिली.
यावेळी सचिव विकास देशमुख,बंडु पवार माजी विद्यार्थी दिपक शिंदे, संजय भोसले,आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थी ,ग्रामस्थ आणि विद्यालयाचे विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका घनवट एस डी यांनी तर सुञसंचालन रुपनवर सर आणि आभार बिडवे सर यांनी केले.