शिक्षणाशिवाय पर्याय नाही -घनश्याम सोनवने.

Spread the love

तडवळे प्रतिनिधी
श्री जे. के.काळे यांचेकडून
स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मांडवे तालुका खटाव येथे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित् बोलताना व्यक्त केले यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर ह भ प दशरथ जाधव महाराज यांचे कीर्तन झाले त्यानंतर जय भगवान सेवा रत्न पुरस्कार चाकण येथील कोयाली फॉरेस्ट या संस्थेचे संचालक अशोकराव देशमाने व त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय शिरसागर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे जयप्रकाश कट्टे इत्यादीमान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल व डिजिटल मीडियाच्या खटाव तालुका अध्यक्षपदी श्री डॉक्टर विनोद खाडे ,तर सचिव पदी जनकल्याण न्यूज चे संपादक श्री. जे.के.काळे, खजिनदार डी.एस.पी न्यूज लाईव्ह चे संपादक दत्तात्रय फाळके तर प्रसिद्धीप्रमुख लालासाहेब माने- पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की भगवान बाबांचे संस्कार माझ्यावर असल्यामुळे मी जातिभेद न मानता सर्वांना सर्व मानव समान आहेत तसेच तळागाळातील माणसापर्यंत प्रबोधन घडवून आणि हेच मी माझे कर्तव्य समजतो जमिनी विका पण शिक्षण घ्या , शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी सांगितले आहे बाबांचे आदर्श मूल्यावरच मी जीवन जगत आहे तरुणांनी आपल्या समाजातील रूढी परंपरा जोपासाव्यात तसेच अनिष्ट रूढी, परंपरा यांना तिलांजली द्यावी असेही त्यांनी सांगितले तर यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर तसेच मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज व अशोकराव देशमाने यांची मनोगते झाली. यावेळी मांडवे गावातील ग्रामस्थ तसेच जय भगवान बाबा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!