प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा

Spread the love

विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरुम, ता. उमरगा, (प्रतिनिधी) :

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा….

येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा शनिवारी (ता. २८) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सच्छिदानंद अंबर होते. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक मुख्याध्यापक करबसप्पा ब्याळे, प्रा. शोभा पटवारी, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, धनराज हळळे, संगमेश्वर लामजने, विरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सच्छिदानंद अंबर यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद मेळाव्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जगदीश सुरवसे यांनी मानले.
विद्यार्थ्यांना कमवा‎ व शिका याची जाणीव, विविध व्यवसाय व व्यवहाराची‎ माहिती व्हावी, यासाठी हा बाल‎ आनंद मेळावा घेण्यात आला.‎ आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी‎ पाणीपुरी,‎ भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन,‎ आप्पे, कचोरी, वडापाव, इडली,‎ मसाला पापड, भजे, पॅटिस आदी‎ विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या आनंद मेळाव्यात विविध प्रकारच्या पाककला तयार करून महिलांनी आनंद मेळाव्यात सहभाग नोंदवला. सहशिक्षिका संगीता देशमुख, नेहा माने, शितल घोडके, सरस्वती समन, तनुजा जमादार, प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, सुधाराणी शेळके, श्रीदेवी मंडले, पुजा मरबे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या आनंद मेळाव्यास विद्यार्थी, पालक बहुसंख्येने सहभागी झाले होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा साजरा करताना मान्यवर, शिक्षक, पालक विद्यार्थी आनंद लुटताना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!