दहिवडी येथे लोक अदालती मध्ये 88 खटले तडजोडी ने मिटविले, दहिवडी न्यायालयाचे उल्लेखनीय कार्य.
दहिवडी वार्ताहर
दि. १४.१२.२०२४ रोजीचे राष्ट्रीय लोकअदालतीचे दहिवडी न्यायालयाचे वतीने यशस्वी आयोजन करण्यात आले.
मा. विधी सेवा समिती दहिवडी यांचे निर्देशानुसार दिवाणी व फौजदारी न्यायालय दहिवडी व विधी सेवा समिती दहिवडी यांचे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे अशी प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी दिवाणी कडील ७० व फौजदारी कडील १८ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकली करणेत आली. सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे पॅनेल प्रमुख म्हणून मा. श्री. एस.एस. गाडवे, दिवाणी न्यायाधीश क. स्तर दहिवडी यांनी काम पाहिले. सदर राष्ट्रीय लोकअदालतीस विधीज्ञ तसेच पक्षकारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला व सदर राष्ट्रीय लोकअदालत यशस्वतीरित्या पार पाडण्यात आले.
यासाठी दहिवडी पोलीस व दहिवडी परिसरातील वकिलांनी विशेष परिश्रम घेतले. यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक खर्च कमी झाला असल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.