म्हसवड वार्ताहर –



जिल्ह्यात टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत माणगंगा इंग्लिश मेडीयम स्कुल चा दबदबा
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा चे आयोजन श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रम शाळा, खराडेवाडी,ता. फलटण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 वर्षीय मुलींच्या गटात जिल्हास्तरीय चे प्रथम क्रमांक व 14 वर्षीय मुलींच्या गटात माणगंगा इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळविले व कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. माणगंगा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक डॉ. वसंत मासाळ, सचिव नारायण मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ,डॉ. सविता मासाळ, माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री रावसाहेब मासाळ व सर्व पालक वर्ग आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या….