
म्हसवड- वृत्तसेवा
म्हसवड येथे रविवार आठ जून रोजी समस्त पोरे परिवार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून या स्नेह मेळाव्यास राज्यातील पोरे बंधू भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत नामदेव समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी केले आहे
रविवार दिनांक ८ जून रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीमध्ये म्हसवड येथील श्री नामदेव चांदवले संचलित यशोदा मंगल कार्यालय येथे पोरे परिवार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ,नामदेव समाज उन्नती परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजयजी नेवासकर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बांधवांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे यामध्ये उल्लेखनीय समाजसेवेबद्दल वृषाली संजीवशेठ तूपसाखरे( नाशिक) उषाताई गजानन पोरे (पुणे )तसेच वैभव विठ्ठल पोरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे
या परिवार स्नेह मेळाव्यासाठी पोरे बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नामदेव समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी केले आहे.