Advertisement

आ. जयकुमार गोरेंचा दणदणीत विजयी चौकार | आमचं ठरलंय टीम पुन्हा अपयशी

आ. जयकुमार गोरेंचा दणदणीत विजयी चौकार | आमचं ठरलंय टीम पुन्हा अपयशी

 

दहिवडी- वार्ताहर…
माण खटाव विधानसभेची सुरुवातीला रंगतदार व चुरशीची वाटणारी लढत जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या बडे मिया छोटे मिया जोडीने एकतर्फी विजय खेचून आणत ४९४९७ इतक्या मताधिक्याने चौथ्यांदा विजयी झाले व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना ९८९१७ मते मिळून पराभूत झाले
जयकुमार गोरे यांचा विजयी रथ रोखण्यासाठी सनदि अधिकारी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप यांनी माणमध्ये २०१९ प्रमाणे २०२४ ला आमचं ठरलंय टीमने एकत्र येऊन ताकदीने काम केले. २०१९ ला ३०४३ मतांनी निसटता विजय झाल्याने त्यांनी ५ वर्षामध्ये विकास कामाचा डोंगर उभा केला. २०२४ माण खटावच्या जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटून उरमोडी आणि जिहे कटापुरचे पाणी शेवटच्या गावापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविले त्यामुळे माण खटावच्या जनतेने विकासकामे केलेल्याची जाण ठेऊन जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याने चौथ्यांदा आमदार बनविले.
जयकुमार गोरे यांना शासनाची लाडकी बहीण योजना व उरमोडी आणि जिहे कटापुरचे पाणी या दोन योजना व गेल्या दहा वर्षापासून विरोधात असणारा सख्खा भाऊ शेखर गोरे एकत्र आल्याने व कायमच विरोधात असणारे डॉ. दिलीप येळगावकर व मार्डीचे डॉ. संदीप पोळ यांच्यामुळे मतांचा डोंगर उभा राहिला आणि विक्रमी मताने निवडून येऊन स्वतःचा विक्रम मोडला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना अचानक शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी मिळाल्याने त्यांना प्रचारसाठी वेळ मिळाला नाही व मतदारांसमोर जाताना विकास कामाचा कोणताही अजेंडा दाखवायला नसल्याने मतदारांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान करायचे असे प्रश्न समोर असल्यामुळे आणि जयकुमार गोरे यांच्या विकास कामाचा डोंगर उभा असल्यामुळे प्रभाकर घार्गे यांना ८८७१७ मते मिळून ४९४७९ मतांनी पराभव पत्करावा लागला.
जयकुमार,शेखर, आणि अंकुश गोरे तिन्ही भावांनी अहोरात्र घेतलेल्या कष्टामुळे माण तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतमध्ये मोठे मताधिक्य मिळाले तर प्रभाकर घार्गे यांना माण मधून १०% गावामध्ये मताधिक्य मिळाले. तर खटाव मधूनही मोठ्या ग्रामपंचायतमध्ये जयकुमार यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामध्ये म्हसवड, दहिवडी, पळशी, मलवडी, गोंदवले, वरकुटे मलवडी, बिदाल,वडूज या मोठा गावामध्ये जयकुमार यांना मताधिक्य मिळाले आहे.

निवडणूक प्रचारात नसणाऱ्यांना निकालाची चिंता

 

(अजित जगताप)
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा दिवस उजाडला आहे. या निवडणुकीमध्ये कुठेही प्रचारात नसणारी मंडळींना आता निकालाची चिंता लागल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील मतदाराची संख्या पाहता या वेळेला ७५ टक्के मतदान होईल असं सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनीही वाहनांची व्यवस्था केली होती . एका गावातील एकाच पक्षाचे चार ते पाच गट असल्याने नेमकं विजयाचे श्रेय कोणी घेऊ नये याची व्यवस्था करण्यात आली होती.तरी ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदानाला आपापल्या गावी जाणाऱ्या मतदारांना सार्वजनिक एसटी वाहतूक सेवा विस्कळीतपणा झाल्यामुळे मतदान करण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे किमान तीन ते पाच टक्के मतदान इच्छा असूनही झालेले नाही. या मतदारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागले होते. मतदानाच्या यंत्रणा वाहतूक करण्यासाठी बऱ्याच एस.टी. बस मतदान केंद्रात गेल्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी आपापल्या गावी जाता आले नाही. काहींनी खाजगी वाहने करून आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. ते कौतुकास पात्र आहेत.
या मतदान केंद्रामध्ये चांगली व्यवस्था झाल्यामुळे ग्रामीण भागात बऱ्यापैकी मतदान झाले. याउलट शहरी भागामध्ये काही ठिकाणी शाकाहारी मांसाहारी जेवणाचा सपाटा उमेदवारांनी उघडपणे लावला होता. जेवणाची पाने तीनशे आणि मतदान दोनशे हे सुद्धा पाहण्यास मिळाले. वास्तविक पाहता लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सध्या एक्झिट पोलचा कौल म्हणजे थोतांड असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी व महायुती आणि निवडणुकीचे निकाल बाहेर झाल्यानंतर महायुतीआघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये तथ्य दिसून येणार आहे.
पाच वर्षानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार तयारी करणारे राजकीय पक्ष व उमेदवार यांनाच मतदारांनी स्वीकारले आहे . अपक्षांना फारसा वाव मतदार देत नाहीत. हे सुद्धा प्रचार यंत्रणेत दिसून आलेले आहे. पाटण व वाई मतदारसंघात अपक्षांना मिळणाऱ्या मतांमुळे धक्कादायक निकाल लागू शकतो. हे त्रिवार सत्य आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी घराबाहेर न पडणारे काहीजण आता फोना फोनी करून विचारणा करू लागलेले आहेत. अशा लबाडांना विजय मिरवणुकीत सामील करून घेऊ नये .असे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे.
————————–

——- महत्वाची चौकट—-प्रसारमाध्यमातून वारे माप जाहिरात बाजी करून सुद्धा ज्यांचा पराभव झाला. त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. याउलट समाज माध्यमावर ज्यांनी योग्यरीत्या प्रचार केला त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हे सत्य आहे की नाही? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

error: Content is protected !!