
विजय टाकणे
म्हसवड, दि. १८ नोव्हेंबर राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
त्या निमित्त सगळ्याच पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनीही रॅली, पदयात्रा आणि भाषणे करत आपला प्रचार केला.माण तालुक्यातील खटाव तालुक्यातील सांगता सभा झाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली असून काल संध्याकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावल्या. शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते मैदानात उत्तरले होते.
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी दहीवडी व खटाव तालुक्यातील गावात रैली काढून सांगता केली.
गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेते हे प्रचाराच्या रिंगणात उतरले होते.काल प्रचाराचा शेवटचा शेवटच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सांगता सभा झाल्या.यामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अनेक नेत्यांच्या प्रचार सांगता सभा झाल्या या सभांमुळे देखील निवडणुकांचे वातावरण बदलण्याची शक्यता आहे.