
म्हसवड…. प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी अवांतर वाचनाची आवड जोपासून हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याचे आवाहन माजी अधीक्षक कृषी अधिकारी एम.डी.सावंत यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड येथे क्रांतिवीर जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अधीक्षक कृषी अधिकारी एम.डी सावंत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होती. यावेळी बोलताना एम डी. सावंत म्हणाले ग्रामीण विद्यार्थ्यां मधील क्षमता खूप चांगली असते. त्यांना गरज असते योग्य मार्गदर्शनाची. आदर्श विद्यार्थी घडवण्याचा दृष्टिकोन क्रांतिवीर संकुलाचे संस्था अध्यक्ष व त्यांचे सहकारी करीत आहेत त्याचा लाभ तुम्ही येण्याची गरज आहे. शालेय स्तरावरच भविष्याचे ध्येय निश्चित करा. वेळेचे योग्य नियोजन करा. जिद्द चिकाटी बाळगा. नेहमी सकारात्मक रहा. अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य द्या. शालेय शिष्यवृत्ती परीक्षा हा भविष्याच्या स्पर्धा परीक्षेचा पाया असल्याने अभ्यासामध्ये नियमितपणा ठेवण्याचे आवाहन सावंत यांनी केले.
यावेळी एम.डी सावंत यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना , कृषी विद्यापीठ व त्यामधील शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम याबाबत मार्गदर्शन केले. मी व माझे अनेक सहकारी महाराष्ट्र राज्य प्रशासनात अधिकारी झालो मात्र कृषी मित्र विश्वंभर बाबर यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली,. विश्वंभर बाबर यांच्या कृषी क्षेत्रातील सर्वांगीण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र कृषी विभागातील सर्वोच्च कृषिरत्न पुरस्कार देऊन शासनाने त्याचा गौरव केला ही अभिमानाची बाब आहे.. दर्जेदार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अधिकारी बनविण्याची फॅक्टरी सुरू केल्याबद्दल कृषी मित्र विश्वभर बाबर यांचा मला सार्थ अभिमान असल्याचे सावंत यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर म्हणाले जिद्द व चिकाटी ठेवल्यास गरीब.,सामान्य घरातील विद्यार्थी काय होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे एमडी सावंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार पल्लवी सावंत यांनी व्यक्त केले.
