▪️ मैत्री रन टी शर्ट अनावरण कार्यक्रम वडूज येथे संपन्न
▪️ रविवार दि. १ रोजी भव्य मॅरेथान स्पर्धा

वडूज/प्रतिनिधी : विनोद लोहार
वडूज: एकविसाव्या शतकातील जीवन शैली पूर्णपणे बदललेली असून मानवाची प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मात्र मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमुळे जीवनाचा कायापालट होऊ शकतो. तंत्रशुद्ध पद्धतीने धावाल तर आणि तरच आयुष्याची गाडी निरोगी धावेल असे प्रतिपादन अश्विन बोटे यांनी केले.
येथील यशंवत सभागृहात मैत्री कला , क्रिडा व सांस्कृतीक मंडळाच्या वतीने ‘ मैत्री रन – २०२४ ‘ मॅरेथॉन स्पर्धेच्या टी शर्ट अनावरण प्रसंगी बोटे बोलत होते. यावेळी अध्यक्ष नरेंद्र गोडसे , डॉ. अजित इनामदार , शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, डॉ . सुधीर पवार, डॉ.दयानंद घाडगे, प्रशांत सरनोबत, सुरज कचरे , यांची प्रमुख उपस्थिती होती .
डॉ. महेश काटकर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले कि , वडूज शहराला ऐतिहासीक वारसा असून येथील विविध सामाजीक संस्था , आरोग्य , पर्यावरण आणि स्वच्छता याबाबत नेहमीच सतर्क असतात. शहर व परिसरातील लोकांचे राहणीमान व आरोग्यदायी व्यायाम यासाठी विविध संकल्पना द्वारे समाजहित जोपासले गेले आहे . चालणे, धावणे आणि सायकलींग या व्यायाम प्रकारा मुळे जीवन शैलीत बराच फरक पडतो असेही डॉ. काटकर म्हणाले. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, डाँ .सुधिर पवार , डाँ.शंतनू पवार,डाँ . दयानंद घाडगे, धावपटू जयंत शिवदे ,सुरज कचरे,प्रशांत सरनोबत आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली.
उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचलन अँड. अनिल गोडसे यांनी तर आभार राजकिरण लंगडे यांनी मानले.या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक , सहप्रायोजक , नगरसेवक अभयकुमार देशमुख, जयवंत गोडसे, डॉ. प्रविण चव्हाण , डॉ . सुरेश कोळेकर, डॉ .चंद्रशेखर नांगरे , डॉ. धनंजय खाडे , डॉ. कुंडलीक मांडवे ,श्रीनिवास कदम , डाँ . हनुमंत मासाळ, अमित दळवी, संतोष कुलकर्णी , डॉ. प्राजक्ता काटकर , डॉ . जयश्री मासाळ, डॉ. रुपाली मुळे, सदाशिव बागल, शीतल गोडसे, सरिता घार्गे,डॉ. निता इनामदार , गोविंद भंडारे, मनोज राऊत, संतोष शहा आदिंसह मैत्री कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते .
चौकट …
रविवार दि. १ डिसेंबर रोजी मैत्री रन – २०२४ . .
वडूज येथे रविवार दि. १ डिसेंबर रोजी महिला व पुरुष यांचेसाठी १० व ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे . आकर्षक बक्षिसांसह टी शर्ट, मेडल , बीआयबी , अल्पोपहार , सर्टिफिकेट मिळणार आहे. तरी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले .
फोटो ..
वडूज येथे मैत्री रन – २०२४ टी शर्ट अनावरण प्रसंगी मान्यवर( छाया : विनोद लोहार)
Leave a Reply