म्हसवड वार्ताहर
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी रथयात्रा 2डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्ताने सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार महेश आहिर, म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी सचिन माने,आरोग्य विभाग कर्मचारी, एसटी महामंडळ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी,ग्रामस्थ, पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, यांचेसह
श्रीमंत गणपतराव राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत अँड.पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने, श्रीमंत दिपसिंह राजेमाने, श्रीमंत विश्वजित राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने , इंजिनीयर सुनील पोरे,श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी वैभव गुरव,अकिल काझी, युवराज सुर्यवंशी,आदी मानकरी व माळी, लोहार, सुतार, व बारा बलुतेदार मानक-याच्या उपस्थितीत होते.
यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, म्हसवड येथील येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा देण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे, म्हसवड ग्रामस्थांनी ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
पोलीस व ग्रामस्थांनी समन्वयाने काम करुन यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करावेत, वीज, पाणी व स्वच्छता विभाग यासाठी नगरपालिका व शासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे.
कोणत्याही कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी चोख काम करावे. यात्रेची सुसंस्कृत परंपरा जपावी, असे ते म्हणाले.
…..

Leave a Reply