मायणी प्रतिनिधी . ( जे.के.काळे यांचे कडून) .
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्राधान्याने प्रश्न सोडवणार असे प्रतिपादन राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दहिवडी तालुका माण येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले .यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी सदस्या व सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनियाताई गोरे तसेच भाजपा माणचे अध्यक्ष प्रशांत गोरड, ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमारवार ,सरचिटणीस दयानंद एरंडे, राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे,माण गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे ,खटाव गटविकास अधिकारी योगेश कदम ,सहाय्यक गटविकास अधिकारी माण – खटाव डॉ. चंद्रकांत खाडे, डॉ. सागर खाडे व जिल्हा अध्यक्ष श्री जे के काळे उपस्थित होते .
पुढे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, ग्रामपातळीवर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्याची भूमिका ही मुख्यमंत्री यांनी घेतली असून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम दिली आहे अनेक नेते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन उपोषण करतात पण ते तीस वर्षे सतेत होते त्यावेळी ग्रामपंचायत कामगार का दिसला नाही ? असा सवाल नाव न घेता माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर लगावला .
पुढे ते म्हणाले की ज्यांनी मदत केली त्यांचे नाव काढणे गरजेचे आहे यावेळी ते म्हणाले की स्थानिक पातळीवर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी ,रोजगार सेवक, संगणक ऑपरेटर, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ,कोतवाल यांना मानधन वाढवण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले .ग्रामपंचायत कर्मचारी यांचे अनेक महिन्याचे वेतन थकल्याचे समजले जर असे आढळून आले तर संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित प्रकारे कारवाई करू असे त्यांनी मेळाव्याला उद्देशून सांगितले. आपण करीत असलेल्या मागण्या ह्या न्याय असून वेतनश्रेणी, वसुलीच्या रद्द करणे इत्यादी मागण्या लवकरच मा. मुख्यमंत्री यांच्या समक्ष सोडवले जातील असे अभिवचन मंत्री गोरे यांनी दिले.
तर कर्मचाऱ्यांचे राज्याचे अध्यक्ष विलास कुमारवार यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न अतिशय मोजके शब्दात मांडले तसेच ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात झालेल्या बैठकीचा आवर्जून उल्लेख केला . तसेच वेतनश्रेणी ,वसुली अट रद्द करणे ,उपदान इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तर सरचिटणीस दयानंद एरंडे यांनी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतलेल्या मेळाव्याच्या आठवण करून देऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडले.
तर सातारा जिल्हा ग्रामपंचायत कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री जे.के. काळे यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की ग्रामपंचायत कर्मचारी हा गावातील विकासाचा दूत आहे आणि आज रोजी तोच उपाशी आहे तरी आजपर्यंत अनेक मंत्री होऊन गेले परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी मा.ना. जयकुमार गोरे सोडले तर कोणत्याच मंत्र्यांनी लक्ष दिले नाही असे ते म्हणाले
या कार्यक्रमास गणपतराव फडतरे, सचिन मोरे, जावेद भाई पठाण ,तुषार सनस ,अमोल काळोखे ,प्रशांत साळुंखे, तसेच राज्यातून दोन हजार कर्मचारी उपस्थित झाले होते उपस्थितांचे आभार माणचे तालुकाध्यक्ष श्री नवनाथ आवळे यांनी केले.
Leave a Reply