Advertisement

सर्व समाजासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करा- ना.जयकुमार गोरे

Spread the love

म्हसवड :- वृत्तसेवा
संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते. त्यांच्या महान कार्याचा वारसा शिंपी समाज एकत्र होऊन पुढे नेत आहे ही बाब निश्चितच प्रेरणादायी असून इंजि. सुनील पोरे यांच्या माध्यमातून हा समाज एक संघ झाला आहे आगामी काळात इंजि.पोरे यांनी सर्वच समाजांतील घटकांसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून कार्य करावे तसेच आपण शिंपी समाज व पोरे कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे उद्गार ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी काढले
म्हसवड येथे समस्त शिंपी समाज पोरे परिवार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी नामदेव समाज परिषदेचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे राज्याध्यक्ष संजय नेवासकर पंढरपूर केशवराज संस्थेचे अध्यक्ष बाळ आंबेकर म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करत आहे. तसेच शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे ते लवकरच मार्गी लागेल आणि त्या माध्यमातून शिंपी समाजातील तरुणांना भविष्यात उद्योग व्यवसाय करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही
संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होऊन गेले आहेत त्यांच्या विचारांचा महान वारसा चालवण्याचे काम समस्त शिंपी समाज एकत्र होऊन करत आहे ही बाब अतिशय प्रेरणादायी आहे असेच एकत्र राहून आपल्या समाज बांधवांचा विकास व्हावा यासाठी नामदेव समाज परिषद अत्यंत तळमळीने काम करत आहे. इंजिनीयर सुनील पोरे ज्या ज्या वेळी भेटत असतात त्या त्या वेळी शिंपी समाजाचे काम सांगितले नाही असे कधीच होत नाही. नामदेव समाज परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पायाला भिंगरी बांधून शिंपी समाजाची मोट बांधण्याचे काम केले असून त्याचाच परिणाम आज समस्त पोरे बांधव स्नेह मेळावा होत आहे यातून त्यांच्या कार्याची ओळख होत आहे मात्र यापुढील काळात त्यांनी सर्व जाती धर्मांच्या उन्नतीसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करावे आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दिला
यावेळी नामदेव समाज परिषदेचे राज्य अध्यक्ष संजय नेवासकर म्हणाले शिंपी समाजाला नामदेव महाराजांचा मोठा वारसा लाभला आहे आम्ही नामदेव समाज परिषदेच्या माध्यमातून शिंपी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी कार्य करत राहू असे सांगितले
इंजि. सुनील पोरे यावेळी बोलताना म्हणाले की राज्यातील समस्त पोरे बांधव आज म्हसवड मध्ये एकत्र येऊन स्नेह मेळावा घेतल्याने मनस्वी मोठा आनंद होत आहे नामदेव समाज परिषद ही सन १९०७ मध्ये स्थापन झाली आहे तेव्हापासून या परिषदेचे कार्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुरू आहे नामदेव महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन ही संघटना कार्य करत आहे रेल्वेची जागा मिळवण्यासाठी या परिषदेने खूप प्रयत्न केले असून मुंबई दिल्ली वारी केल्या आहेत या कामासाठी नामदार जयकुमार गोरे यांची मोलाची मदत झालेली आहे. मात्र काही जण पोकळ वल्गना करून श्रेय लाटण्याचे काम करत आहेत
तसेच नामदार गोरे यांच्या माध्यमातून शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले असून आपण स्वतः या कामासाठी पुढाकार घेऊन हे महामंडळ सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. पंढरपूर येथे होत असलेल्या नामदेव समाज स्मारकासाठी योग्य ते स्थान मिळावे अशी मागणी यावेळी पोरे यांनी ना. गोरे यांच्याकडे केली
या स्नेह मेळाव्यामध्ये माण- खटाव तालुक्याच्या दुष्काळ मुक्तीचा विडा उचलून या दुष्काळी भागाला पाणी देण्याचे पुण्य कर्म केलेल्या ना. जयकुमार गोरे यांना समस्त पोरे परिवाराच्या वतीने मानपत्र देऊन भव्य असा सन्मान करण्यात आला तसेच शिंपी समाजातील वैभव पोरे वृषाली तूपसाखरे उषाताई पोरे यांनी अतिशय उल्लेखनीय समाजकार्य केल्याबद्दल त्यांना समाजाच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राज्यातील कानाकोपऱ्यातून समस्त पोरे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. पोरे यांनी केले आभार करणभैया पोरे आणि मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!