Advertisement

वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस….वितरणात आढळली तफावत

वडूज दि: पावसाळा तसेच परिणामी पूर इत्यादि प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची उचल व वाटप करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता एनएसएफए अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वेळेत वितरण करण्यासाठी तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मात्र अशा परिस्थितीतही काही रेशनिंग दुकानदार ग्राहकांची फसवणूक करत परिणामी, रेशन दुकानदार सरकारच्या मूळ हेतूलाच काळीमा फासू लागले. त्यामुळे अनेक दुकानदारांवर नागरिकांचा रोष वाढू लागला. यामधून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
खटाव तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज या ठिकाणी रास्त भाव दुकानाची तपासणी केली असता अनेक दोष आढळल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकानदाराविरोधात खुलासा सादर करण्यासाठी नोटीस काढली आहे. याबाबत माहिती अशी की, वडूज येथील रास्त भाव दुकानदार शेटे यांच्या दुकानाशी संलग्न असलेल्या जागरूक शिधापत्रिका धारकाने तक्रार केली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने खटाव तालुका पुरवठा अधिकारी व निरीक्षक यांनी २७ जून रोजी सदर रास्त भाव दुकानाची तपासणी केली. रास्त भाव दुकानाला संलग्न शिधापत्रक दर्शनाला फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावला नव्हता. वजन- तराजू प्रमाणपत्र तपासणी वेळी दाखवल नाही. अन्न व औषध प्रशासन प्रमाणपत्र तपासणी वेळी दाखवल नाही. जून ते ऑगस्ट २०२५ धान्य मंजुरी मधून विक्री वजा केले असता गहू ८.२४ क्विंटल व तांदूळ ११.४१ क्विंटल दुकानात जादा असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर तक्रारदार यांच्या शिधापत्रिका ऑनलाईन सात व्यक्ती असून गेल्या एक ते दीड वर्षांपासून सात व्यक्तींची पावती करण्यात येते. त्यापैकी प्रत्यक्षात शासन नियमाप्रमाणे ऑनलाइन पावती न देता साध्या पावतीवरती चार व्यक्तींचे धान्य दिले जाते.
दुसरे तक्रारदार यांना शासन निर्णयानुसार १४ व्यक्तीचे धान्य शासकीय गोडाऊनमधून रास्त भाव दुकानदार यांना पुरवठा विभागाकडून देण्यात येत होते परंतु त्यांची १४ व्यक्तींची पावती काढूनही त्यापैकी प्रत्यक्षात ५ व्यक्तींना धान्य दिले जात होते. लाभार्थ्यांनी दुकानदार कमी धान्य देतात पावती देत नाहीत अंगठे उठवूनही शासन निर्णयानुसार धान्य देत नाहीत.
अशा लेखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी, खटाव यांनी या रास्त भाव दुकान दुकानाची तपासणी केली. त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या. तक्रारदारांचा जाब जबाब नोंदवण्यात येऊन संबंधित दुकानदाराला त्यानंतर लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस काढण्यात आली.
जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ महाराष्ट्र अनुसूचित किरकोळ व्यापार परवाना आदेश १९७९ व शासनाचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार परिच्छेद क्रमांक ११ क्रमांक मधील तरतुदीचा भंग केल्या असल्याचे दिसून आल्याचे नमूद केले आहे. केले असल्याचे दिसून आल्याचे नमूद केले आहे त्यामुळे नोटीस पाठवण्यात आले आहे. सदर तक्रारदार हे दलित समाजाचे आहेत. तरीही त्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदाराच्या अनियमितेबाबत पुरावे सादर करून लेखी तक्रारीद्वारे पाठपुरावा केला. गोरगरिबांना मिळणाऱ्या शिधावर ताव मारणाऱ्या या रास्त भाव दुकानाचा शासनमान्य परवाना रद्द करण्याची मागणीही काही शिधापत्रिकाधारकांनी केलेली आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतल्याबद्दल तक्रारदारांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. संबंधित दुकानदार हा संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समजली आहे. खटाव तालुक्यातील पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने या रेशनिंग दुकानदारावर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली असून कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा तक्रारदारांकडून देण्यात आला आहे.


सातारा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नागठाणे येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न


अनिल वीर
सातारा : येथील यतिमखाना न दाऊळ उलूम एज्युकेशन संस्था नागठाणे व सातारा ऊर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या मार्फत आयोजीत संस्थापक स्वर्गीय इब्राहिम मोहंमद सुतार इबुभाई विनामुल्य आरोग्य शिबीर वेळ संपन्न झाले.
यामध्ये रोगनिदान, मोफत बीपी शुगर डोळे तपासणी व उपचार बाबत तज्ञ डॉक्टरांनी मागदर्शन केले. कार्यकमाचे उद्‌घाटन चंद्रकांत जाधव आप्पा ( माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष) यांच्या हस्ते झाले.यावेळी शफिक भाई शेख ( जिल्हाध्यक्ष, सातारा अल्पसंख्याक राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट) यांनी मार्गदर्शन केले. व्याक्ती व त्यांचे विविध रोग शारीरिक व्याधी व त्यावर उपचार या बद्दल मार्गदर्शन केले.अस्लम भाई सुतार यांनी शाळेबाबत माहिती दिली.डॉ. प्रमा गांधी (वैद्यकिय अधिकारी, पॉलिएटिव्ह केअर,सातारा) यांनी बीपी.शुगर, कॅन्सर रोगा बद्दल व खाण्याच्या विविध सवयी जंकफूड बाबत विशेष माहिती दिली. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभा गांधी, डॉ. राहुल यादव,डॉ. मधुरा पाटील, डॉ. एस.के नायकवडी, डॉ. एन डी पिसे, शितल कारंडे, ऋषभ कुमार तसेच बोरगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक वाळवेकर,डॉ.जीवन मोहिते,उपसरपंच अनिल साळुंखे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय साळुंखे यांची उपस्थिती होती.याकामी,संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सुतार,सचिव अस्लमभाई सुतार व सर्व पदाधिकारी शिक्षक व स्टाफ यांनी अथक असे परीश्रम घेतले. पठाण सर यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : आरोग्य शिबिर प्रसंगी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

गुणवंत विद्यार्थी हीच क्रांतिवीर संकुलाची संपत्ती -.सुलोचना बाबर


म्हसवड …प्रतिनिधी
गुणवंत विद्यार्थी हीच क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड ची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडचा माजी विद्यार्थी विजय हरिदास माने यांची राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार संकुलात आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.
यावेळी बोलता सुलोचना बाबर म्हणाल्या गत पंचवीस वर्षात क्रांतीवीर शाळेने सर्व गुणसंपन्न हजारो विद्यार्थी घडविले. सुरुवातीच्या बॅचच्या अनेक विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यापैकीच एक विद्यार्थी विजय हरिदास माने याची नुकतीच राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदी निवड झाली असून खऱ्या अर्थाने हा क्रांतिवीर संकुलाचा बहुमान आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.
यावेळी बोलताना सत्कारमूर्ती विजय माने म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या बालवाडी स्तरामध्येच माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया मजबूत झाला. याच ठिकाणी प्राथमिक ,माध्यमिक शाखेत माझ्या जीवनाला पैलू पाडण्याचे काम माझ्या गुरुजींनी केले. आज राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मला मिळालेल्या यशाची खरे मानकरी माझे गुरुजन व आई वडील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपण कसे घडलो याबाबत तपशीलवार माहिती विजय माने यांनी दिली. शाळेच्या पहिल्या दिवशी बाबर मॅडम यांनी समजावल्याची आठवण सांगताना विजय माने अत्यंत भाऊक झाले. अभ्यासाबरोबरच खेळ व अवांतर वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी तर उपस्थितांचे आभार अनिल कुमार काटकर यांनी केले.

औंध येथील प्रगतिशील शेतकरी रमेश जगदाळे यांचे दुःखद निधन.

औंधचा रुबल हरपला

औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे

खटाव तालुक्यातील औंध या गावातील प्रगतशील शेतकरी रमेश जगदाळे ( बापू ) यांच्या निधनाने औंध गावावर शोककळा पसरली आहे. औंध गावच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आणणारे व्यक्तिमहत्व,औंध यात्रेतील कुस्ती आखाड्यात प्रख्यात मल्ल उपस्थित करून मैदानाचे शोभा वाढवण्याचे काम बापू यांच्या माध्यमातून होत.
औंध विकास सोसायटीचे चेरमन, औंध कुस्ती कमिटी,यात्रा कमिटी अध्यक्ष औंध ग्रामपंचायत सदस्य आशी विविध पदांवर बापूनी काम केले होते. औंध परिसरातील शेतकरांच्या बटाटा या नगदी पिकाच्या क्षेत्रात उत्तम प्रकारचे बियाणे पुरवणारे आणि कंपनी मार्फत खरेदी करून शेतकरी वर्गाला आर्थिकदृष्टीने सक्षम करणारे औंध नगरीचे हुंडकरी रमेश बापू यांच्या जाण्याने औंधकर हतबल झाले आहेत.गावात रमेश जगदाळे रुबल या नावाने प्रसिद्ध होते.
लहान थोरांशी प्रेमाने वागणे, बोलणे यामुळे गावात बापू सर्वाना प्रिय होते.कायम स्मित हसत बोलणाऱ्या बापूना जगदाळे कुटुंब आणि औंध ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीत विद्यार्थ्यांचा गौरव

(मुरुम प्रतिनीधी)मुंबई महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाच्या घेण्यात आलेल्या उन्हाळी
२०२५ परीक्षा निकाल नुकताच जाहीर
करण्यात आला असून श्री माधवराव पाटील काँलेजऑफ फार्मसीत औषध
निर्माणशास्त्र पदविका डी फॉर्मसी मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे
श्री माधवराव पाटील कॉलेज ऑफ
फार्मसीचा द्वितीय वर्षात
प्रथम..अंकित सुरतबन्सी ..82%
द्वितीय…राजमाने ओमकार..79.82%
तृतीय…श्रीशा मुरुमकर..78.5%आले आसुनडि फॉर्म प्रथम वर्षामध्ये प्रथम..कारभारी मुस्कान..78.73%
द्वितीय…साक्षी पाटील..78.5%
तृतीय…धुमाळ अस्मिता 73.40%
यांनी यश संपादन केले
या प्रसंगी संस्थेचे संचालक तथा उमरगा सहकारी बँकेचे चेअरमन शरणजी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल,पुष्पहार,भेटवस्तु देउन सत्कार करण्यात आला.
कायम दर्जेदार
शिक्षण देण्याची गुणवत्ता जोपासत
यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यानी चांगले गुण प्राप्त केल्यामुळे
विठ्ठल साई कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील,
संस्था अध्यक्ष बापुराव पाटील, श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. अशोक सपाटे, प्राणीशास्ञ विभागप्रमुख डाँ.किरणसिंग राजपुत,पदार्थ विज्ञानचे डाँ.रवी आळंगे,श्री सुदीप ढंगे, प्रा विवेकानंद चौधरी
प्रा.पायल अंबर,प्रा पाटील वैष्णवी,प्रा.विनीत बसवंत बागडे, प्रा.प्रियंका काजळे, प्रा.लिमये राजनदिंनी ,प्रा मुजावर मॅडम ,किशोर कारभारी,कटके
यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

error: Content is protected !!