लोणंद दिलीप वाघमारे
राज्याचे ग्रामविकास मंत्री ना
जयकुमार गोरे यांनी आगामी जिल्हा परिषद व परिषद समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भादे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची लोणंद येथे आढावा बैठक घेतली
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके -पाटील, गोरखराव धायगुडे, प्रकाशराव कराडे, नारायराव ठोंबरे,ऋषिकेश धायगुडे, हिरालाल धायगुडे, कालिदास धायगुडे, ज्येष्ठ नेते सुभाष क्षीरसागर, मिठुभाई पटेल, देविदास चव्हाण,आप्पासाहेब ओतारी, भाऊसाहेब शेळके,लखन गोंडे, चांगदेव वाघमोडे, आप्पासाहेब शेळके, भाऊसाहेब धायगुडे, अनिल नरुठे, श्रीधर सोनवलकर, विकास क्षीरसागर, अमर आतार, सलीम शेख, जमीर शेख, श्रेयस शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
भादे गटात प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निधी द्यावा अशी मागणी प्रकाश कराडे यांनी केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १००% भाजपचे उमेदवार निवडून आणू अशी खात्री नारायण ठोंबरे यांनी दिली.
आनंदराव शेळके मामांसारखा ४ वेळा जिल्हा परिषदेला निवडून आलेला नेता तुमच्या पाठीशी आहे,
भविष्य काळात कोणत्याही गावात निधी कमी पडू देणार नाही.
ताकदीने भारतीय जनता पार्टीचे काम करा असा विश्वास ग्रामविकास मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
स्वागत भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी केले व आभार गणेश गुंडगे यांनी मानले.
