Advertisement

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशीनंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ७ : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि बोदवड तालुक्यातील घाणखेड येथे १५ वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला असून विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या अहवालानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री. गोरे म्हणाले, मौजे वढोदा येथील ग्रामसेवक यांची बदली झाली असून त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे सरपंचांवर नियम ३९/१ अन्वये कारवाई केली जाईल. तर, मौजे घाणखेड येथील ग्रामसेवक यांचे निलंबन करण्यात आले असून सात महिन्यांनंतर पुनर्स्थापित करण्यात आले आहे. त्यांची सुद्धा विभागीय चौकशी सुरू असून दोन्ही प्रकरणी विभागीय चौकशीचा जो अहवाल येईल, त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि  कार्यकारी अभियंत्याचे निलंबन – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाच्या पूर्वीच १४७ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीअंती संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी पुढील दोन महिन्यात करण्यात येणार असून यात जे तथ्य आढळेल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. यात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य ॲड.अनिल परब, भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारला.

मंत्री गोरे म्हणाले की, या बांधकामांदर्भात चौकशी करण्यात आली असून प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा अधिकचे मूल्यांकन मोजमाप पुस्तिकेत नोंदविण्यात आले आहे. कामाचे फोटो, टेस्ट रिपोर्ट नसतानाही देयके मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भात आदर्श कार्यपद्धती असूनही त्यानुसार ही देयके अदा केली असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे.

श्री सर्वजन हितैषी ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फराळ वाटप

पंढरीत देवशयनी एकादशी निमित्त श्री सर्वजन हितैषी ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फराळ वाटप

साबुदाणा खिचडी केळी शेंगदाणा लाडू, पिण्याचे शुद्धपाणी वाटप करण्यात आले

पंढरपूर : पंढरपूर येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात अशा भाविक वारकऱ्यांना कोलकत्ता येथील श्री सर्वजण हितैषी ट्रस्टच्या वतीने लक्ष्मणबाग येथे मोफत फराळाचे वाटप करण्यात येते.
जगद्गुरु रामानुजाचार्य श्री झालरिया पिठाधिपती श्री श्री 1008 श्री स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून गेल्या सात ते आठ वर्षांपासून पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आषाढी यात्रेतील हजारो भाविक, वारकऱ्यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात येत असते.

याचे आयोजन लक्ष्मण बाग येथील व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यंदाही मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, शेंगदाणा लाडू, केळी तसेच शुद्ध पिण्याची बाटली, खजूर असे संपूर्ण फराळाचे वाटप करण्यात येते. या वाटपाचे नियोजन व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यावर्षी वाटप करण्यासाठी नागपूर येथील ओमप्रकाश सरोदे यांनी सहकार्य केले तर सदर फराळ वाटपा मध्ये जगदीश टाक,प्रमोद शेंडे,प्रताप परिहार,मोहन भोईर,दिनेश खंडेलवाल,राजेश देशमुख, रामचंद्र पाटील, प्रदिप सुरवसे,राजराजेश्वरी रेखाताई टाक, विलास खंकाळ, गोविंद कदम तसेच सरोदे परिवार यांचे मोलाचे योगदान लाभले.
देवशयनी एकादशी निमित्त यंदाही आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या महिला,पुरुष व जेष्ठ वारकरी भाविकांना फराळ वाटप केल्यानंतर त्यांनी श्री सर्वजण हितैषी ट्रस्टचे मनापासून आभार मानले तसेच फराळ वाटप करताना राम कृष्ण हरी,जय हरीच्या गजरात वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मनापासून धन्यवाद दिले.

बसवेश्वर पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवशरण वरनाळे तर व्हाईस चेअरमनपदी शरणप्पा मुदकन्ना यांची बिनविरोध निवड.


(मुरुम प्रतिनीधी, ता. उमरगा, ता. ५ ) :
येथील महात्मा बसवेश्वर व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने शनिवारी (ता. ५ ) रोजी सर्वानुमते शिवशरण वरनाळे यांची चेअरमन पदी तर शरणप्पा मुदकन्ना यांची व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड केली. ही निवड जागतिक सहकार दिनाच्या निमित्ताने पतसंस्थेच्या बसव सहकार भवनच्या सभागृहात पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ज्ञानराज चौगुले होते. यावेळी भीमराव वरनाळे, पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना, भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजी फुगटे, व्यापारी पतसंस्थेचे नूतन संचालक बाबासाहेब बिराजदार, शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, तालुका उपप्रमुख व्यंकटराव पाटील, आप्पासाहेब पाटील, माजी प्राचार्य दत्ता इंगळे, बलभीम येवते आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन शिवशरण वरनाळे व व्हाइस चेअरमन शरणप्पा मुदकन्ना यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बोलताना चौगुले यांनी पतसंस्थेच्या सामाजिक व आर्थिक योगदानाचे कौतुक केले आणि संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी नवीन नेतृत्वाकडून पारदर्शक कारभार व सभासदांच्या हितासाठी कार्य करण्याचा संदेश दिला. त्यांनी सहकार चळवळीवर प्रकाश टाकून पतसंस्थेला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र राहण्याचे आव्हान केले. यावेळी शिवशरण वरनाळे, चंद्रशेखर मुदकन्ना यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्ता इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार मनीष मुदकन्ना यांनी मानले. या कार्यक्रमाला पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम ता.उमरगा येथील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या नूतन चेअरमन वरनाळे व व्हाईस चेअरमन मुदकन्ना यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना ज्ञानराज चौगुले व अन्य पदाधिकारी.

वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी अमोल बनसोडे यांची निवड

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी/अभिजीत लेभे

वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेची आज लोणंद येथील शासकीय विश्रामगृह येथे मासिक मीटिंग पार पडली.

या मीटिंगमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब डावरे आणि सर्व पदाधिकारी यांच्या एकमताने श्री अमोल बनसोडे यांची वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वीर योद्धा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली जातात

काही महिन्यांपूर्वीच लावलेलं हे छोटसं रोपट आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना दिसत आहे.

श्री अमोल बनसोडे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात संभाषण कौशल्य तसेच संघटित राहणे हा श्री अमोल बनसोडे यांच्यातील एक महत्वाचा गुण असल्याचे यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष डावरे यांनी सांगितले ही निवड होताच नींबूत येथीलआदर्श मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने व संकेत लाईट्स अँड डेकोरेशन यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

तसेच अमोल बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की यापुढे देखील सर्वच समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्यासाठी कटिबद्ध राहीन.

सामाजिक,पत्रकारिता,कार्यक्षम नेतृत्व क्षेत्रातील “कर्मजीत” पुरस्काराने डॉ. रामलिंग पुराणे सन्मानित

(मुरूम प्रतिनीधी ता.०७)

सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे यांना सामाजिक बांधिलकी, कार्यक्षम नेतृत्व आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सजगतेची दखल घेऊन पुणे येथील जनकल्याण बहुउद्देसिय फाऊंडेशन व आशुतोष डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या हस्ते “कर्मजीत” पुरस्काने सन्मानित करण्यात आला. दि. ०४ जुलै रोजी पुणे येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. पुराणे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नाट्य परिषद अध्यक्ष मेघराज राजेभोसले,पोलीस उपायुक्त शहाजीरावं पाटील,संजवीनी बालगूडे,आयोजक आशुतोष शंकये पाटील आदी मानायवरांची उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकी, कार्यक्षम नेतृत्व आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सजगता निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा राज्यस्तरीय सन्मान करण्याच्या प्रेरणेने आयोजकाच्या वतीने “कर्तृत्ववान पुरस्कार सोहळा २०२५” आयोजित करण्यात आला होता. या गौरवस्पद सोहळ्यात, समाजहितासाठी सतत कार्यरत असलेल्या आपल्या योगदानाची योग्य दखल घेत, “कर्मजीत पुरस्कार – २०२५” आयोजन करण्यात आले होते, डॉ. पुराणे एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, दृढ संघटनात्मक नेतृत्वकर्ते, आणि सजग पत्रकार म्हणून गेली अनेक वर्षे राष्ट्राच्या विविध भागांमध्ये समाजातील गरजू, उपेक्षित, आणि वंचित घटकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांची संघटनात्मक धोरणांवरील उत्कृष्ट पकड, भक्कम विचारधारा, आणि सामाजिक चळवळीतून निर्माण केलेली जागरूकता ही समाजासाठी आशेचा किरण ठरली आहे. “कर्मजीत” या नावाचा अर्थच आहे आपल्या कर्तृत्वाने जीवनावर विजय मिळविणे. “कर्मजीत पुरस्कार” हा केवळ एखाद्या यशस्वी व्यक्तीचा गौरव नाही, तर तो समाजासाठी न थकता, न थांबता कार्य करणाऱ्या कर्तृत्वशील जीवनदृ‌ष्टिकोनाचा सन्मान आहे आणि या सन्मानाचे डॉ. पुराणे हे योग्य अधिकारी असल्याचे दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. डॉ.पुराणे यांचे सामाजिक कार्याबरोबर संघटनात्मक धोरण,पत्रकारिता क्षेत्रात पकड मजबूत आहे, पन्नासहुन अधिक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांचे अनेक आंदोलने राज्य आणि देश पातळीवर गाजले आहेत. डॉ.पुराणे यांना सामाजिक कार्यातील डॉक्टरेट पदवी ही प्राप्त झाली आहे. नुकतेच त्यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट संस्थाच्या वतीने “गुणीजन गौरव” पुरस्कार ही जाहीर झाला आहे. त्यांना आतापर्यंत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार,समाजभूषण, समाजचिंतक,समाजरत्न,कोरोना योद्धा,जननायक,लोकतंत्र के प्रहरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र समाजरत्न असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

error: Content is protected !!