Advertisement

सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूलचा दहीवडीत दिंडी सोहळा संपन्न

सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूलचा दहीवडीत दिंडी सोहळा संपन्न

बिदाल प्रतिनिधी दि 

दहीवडी (ता. माण) येथे सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूल यांच्यातर्फे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक पोशाखात टाळ, मृदंग आणि अभंगाच्या गजरात दिंडी सादर झाली.

या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम तीन ठिकाणी पार पडला – बाजारपटांगण, तीन बत्ती चौक, आणि शेवटी ग्रामदेवत सिद्धनाथ मंदिर येथे कार्यक्रम सादर करण्यात आला.

हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणाची साथ, ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा रुख्मीनीचा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले.विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक आणि हुभेहुब वेशभूषा केल्याचं दिसून आलं

शाळेच्या शिक्षकवृंदांनी तसेच पालकांनीही या सोहळ्यात सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक वारशाची जाणीव आणि सामाजिक ऐक्याचे भान निर्माण व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

फोटो ओळी 

 दहीवडीत येथे सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूलचा दिंडी सोहळा संपन्न (छायाचित्र आकाश दडस

माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी येथे नवागत स्वागत

म्हसवड वार्ताहर

संघर्षातून उभा राहिले आदर्श माणगंगा शैक्षणिक संकुल.मा.आप्पासाहेब पुकळे.
माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मान खटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे यांनी नावागताचे स्वागत करताना सांगितले. की मासाळवाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये माळरानावर शिक्षणाच्या रूपाने नंदनवन फुलवलेले आहे.

ही शाळा सर्व सोयीनियुक्त स्पर्धेच्या युगामध्ये टिकणारी आहे. या शाळेतील सर्व शिक्षक अतिउच्च शिक्षण घेतलेले आहेत, शाळेत सर्व भौतिक सुविधा पूर्ण आहेत. त्यामुळे हि शाळा आदर्श आहे. संस्थेसाठी लागेल ती मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित मा.नितीन चिंचकर,दैनिक चौफरचे संपादक श्री बापूसाहेब मिसाळ, मानगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी सौ जानका शिंदे नरळे, संस्था अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ,संचलिका सौ सविता मासाळ, प्राचार्य रावसाहेब मासाळ उपस्थित होते. संस्थेविषयी माजी विध्यार्थिनी जनका शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि माणगंगा कॉलेज हे माझा अभिमान आहे, कारण मी स्वतः मानगंगा कॉलेजमध्ये डी एम एल टी करून एक आदर्श उद्योजिका म्हणून मेडिकल विभागात काम करीत आहे.. ज्यांना करियर ची वाट दिसत नाही त्यांनी डॉ मासाळ सरांच्या मार्गदर्शनाखाली या कॉलेजला प्रवेश घ्यावा असेही आवाहन केले.संस्था अध्यक्ष
डॉ वसंत मासाळ यांनी सांगितले की बारा वर्षांपूर्वी ओसाड माळरानावर छोट्याशा पत्र्याच्या खोलीमध्ये सुरू झालेली ही शाळा आज नावारुपाला आलेले आहे त्यात फार मोठा संघर्ष आहे. शाळेत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक,विद्यार्थी आणि मासाळवाडी,कारखेल हिंगणी,ढोकमोड, धुळदेव,भाटकी रांजणी म्हसवड तसेच पंचक्रोशीतील सर्व मुलांचे पालक ज्यांनी या मुलांच्या भवितव्यासाठी मासाळवाडी येथील माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल तसेच मानगंगा पॅरामेडिकल कॉलेज ची निवड आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी केलीआहे, त्यांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेने कार्य केले आहे.मासाळवाडी शाळेमध्ये यावर्षी नव्याने पहिली ते दहावीला आणि नर्सरी ज्युनिअर केजी सिनियर केजी मोठ्या संख्येने प्रवेश झाले आहेत. मान्यवरांच्या हस्ते नवगतांचे स्वागत करीत असताना ढोल ताशांच्या आवाजात फुलांची उधळण करत मुलांचे सेल्फी पॉइंट वरती फोटो काढून गाण्यांच्या स्वरामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.त्याना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ देण्यात आला. कमी खर्चामध्ये सर्वांगीण शैक्षणिक विकास करणारी माणगंगा शाळा ही भविष्यात मान तालुक्यात नावाजलेल्या शाळांच्या यादीत येईल अशा भावना पत्रकार बापूसाहेब मिसाळ यांनी केली आहे आहेत.प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा.प्रास्ताविक प्राचार्य रावसाहेब मासाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सजगाणे सर यांनी केले,नवीन शिक्षकांचे स्वागत करीत सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना,पालकांना शुभेच्छा देण्यात आले….

सन 2025/26 शाळा प्रवेशोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी ता.माणउत्सहात साजरा

        गोंदवले - जिल्हा परिषद प्राथ शाळा कासारवाडी इथे शाळेचा पहिला दिवस स्वागत, पुस्तक वाटप, गणवेश वाटप, एक झाड आईच्या नावे,  पहिलीच्या मुलांची वाजत गाजत झाज पथक बैल गाडीतून मिरवणूक काढली  गुढी उभारून   मुलांना गोड खाऊ देऊन आनंदात प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला  प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिसद सदस्य बाबासो पवार, सरपंच छाया सस्ते, सर्व सदस्य, smc अध्यक्ष ज्ञानेश्वर सस्ते, वसदस्य, माता पालक, शिक्षण प्रेमी, गंगाराम सस्ते, किसन सस्ते, सचिन सस्ते  ग्रामस्थ, पालक मोट्या संख्येने उपस्थित होते,  सर्व शिक्षक, अंगणवाडी ताई, यांनी नियीजन उत्तम केले   तसेच शाळेत मुलाचे पहिले पाऊल ठसे घेण्यात येऊन आठवण म्हणून पालकांकडे जतन करणेस दिले कार्यक्रम अतिशय मनमोहक आणि आनंदी झाला 

छाया – जि.प.सदस्य बाबासाहेब पवार यांनी नविन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून मिरवणूक काढली

लोधवडे प्राथ.शाळेत रथातील मिरवणूकीने नवागत विद्यार्थ्यांचे शाही स्वागत


गोंदवले – सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा लोधवडे या ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ निमित्त नवागत विद्यार्थ्यांनांचे शाही स्वागत करण्यात आले.या प्राथमिक शाळेचे उपक्रमशील व हर हुन्नरी शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे व दिपक जगन्नाथ कदम यांच्या खास संकल्पनेतून व मुख्याध्यापक एम. डी. ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवागत विद्यार्थ्यांनाचे एका मोठ्या रथातून तुरेबाज फेटे परिधान करीत कपाळी कुंकूम तिलक लावून वाद्यांच्या ढोल ताशांच्या गजरात मान्यवर पाहुण्यांच्या साक्षीने ऐटीत व मोठ्या थाटामाटात लोधवडे गावी एका मोठ्या रथातून नवागत विद्यार्थ्यांन्यांची शाही मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनांच्या वरती पुष्पवृष्टी करून शाळेच्या पहिल्या दिवशी पावलांचे ठसे उमटवून त्यांना फुलांच्या पायघड्यातून ,औक्षण करून, सनईच्या गोड मंजूळ स्वरात त्यांच्या हाती गुलाब पुष्पे देऊन शाळेत प्रवेशित केले.
या वेळी शाळेत फुग्यांची पाना फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती.शाळेत गुढी तोरणे उभारण्यात आली होती. मन मोहक रांगोळी काढण्यात आली होती.शाळेतील पहिले पाऊल अशा स्वरुपाचे सुंदर सचित्र बॅनर लावले होते.नवागत विद्यार्थ्यांनासाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.शाळेच्या पहिल्याच दिवशी अतिशय उत्साही प्रसन्न आणि आनंददायी वातावरणात नवागत विद्यार्थ्यांनाचे जबरदस्त असे स्वागत करण्यात आले.सर्व मुले,पालक व पाहुणे आनंदून गेले. गाव आणि शाळा परिसरात एक शैक्षणिक माहोल व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.शालेय परिसर विद्यार्थ्यांनाच्या किलबिलाटाने गजबजून गेला.
या शुभ प्रसंगी एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात विविध प्रकारच्या अनेक झाडांचे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन पाठयपुस्तके, कपडे व बुटांचे मोफत वाटप करण्यात आले.
अशा मंगलदिनी प्रमुख मान्यवर पाहुणे उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने लोधवडे गावचे सरपंच निवास काटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष कुंडलिक चोपडे, उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे,माजी अध्यक्ष राजकुमार माने,सदस्य सुषमा चोपडे, राहुल नष्टे, रेश्मा शिलवंत, तनुजा जगताप तसेच विजय माने महाराज,श्रीकांत काळोखे, विजय माने याशिवाय या नवागत विद्यार्थी उत्सव कार्यक्रमासाठी अपार मेहनत घेणारे लोधवडे शाळेचे सर्व आदर्श गुरुजन यामध्ये मुख्याध्यापक महादेव ननावरे, सह.शिक्षक दिपक कदम ,सतेशकुमार माळवे,सुचिता माळवे ,संध्या पोळ,दिपाली फरांदे,मनिषा घरडे, अश्विनी मगर,अंगणवाडीताई अर्चना माने,सुरेखा जाधव,पूनम अवघडे, पुष्पा जाधव,विद्या पोळ,सर्व अंगणवाडी मदतनीस तसेच अनेक पालकवर्ग,ग्रामस्थ बंधू-भगिनींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती. यावेळी अध्यक्ष,उपाध्यक्ष ,विजय माने महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतेशकुमार माळवे सरांनी केले तर आभार मुख्याध्यापक ननावरे सरांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.शेवटी मुलांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.या दिवशी दुपारी सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात गोड जिलेबी व मसाला भाताचे स्वादिष्ट जेवणही देण्यात आले.सध्याला या आगळ्या वेगळ्या विद्यार्थी नवागतांच्या स्वागत उपक्रमाचे सर्वच स्तरातून भारी कौतुक होत आहे. माण तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मा.लक्ष्मण पिसे,पिंपरी केंद्रप्रमुख मा.शोभा पवार यांनी लोधवडे शाळेचे खास करून अभिनंदन केले.


छाया – नवागत विद्यार्थ्यांचे रथातून मिरवणूकीने शाळेत प्रवेश करताना मान्यवर पाहुणे.

कु. आसावरी मेळावणे हिचे दैदीप्यमान यश

म्हसवड वार्ताहर — मेरी माता हायस्कूल व ज्यु. कॉलेज म्हसवड ची विद्यर्थिनी कु.असावरी सतीश मेळावणे हिने महाराष्ट्र राइफल असोसीएशन द्वारा मुंबई (वरळी) येथे आयोजित 28 व्या कॅप्टन.एस.जे इझेकल राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेमध्ये 10 मी एअर रायफल पीपसाईट प्रकारात सब युथ युथ व ज्युनियर या 3 वयोगटामध्ये
सहभाग नोंदवताना 400 पैकी 391 गुण मिळवत 2 सुवर्ण व 1 रौप्य 🥈अशा एकूण 3 पदकांची कमाई करून उत्तुंग यश संपादन केले.
मागील तीन वर्षांपासुन शालेय अभ्यास करत एका स्वतंत्र स्वप्नाचा पाठलाग करत राज्य, राष्ट्रीय स्तरावर कु. असावरी ने अथक परिश्रम नियमित सराव करीत यश प्राप्त केले आहे.
म्हसवड शहराचे API श्री. अक्षय सोनवणे, मेरी माता स्कूलचे प्राचार्य फादर सनु यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.
सदर यश प्राप्ती साठी प्रशिक्षक आकाश गुजरे यांचे मार्गदर्शन लाभले.

दहावीच्या परिक्षे मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचा निकाल ९४.०४ टक्केदहावीच्या परिक्षे मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचा निकाल ९४.०४ टक्के

वृत्तसेवा
म्हसवड दि प्रतिनिधी
फेब्रु/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षे मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचा निकाल ९४.०४ टक्के लागला असून एकूण १३४ विद्यार्थी परिक्षेला बसले त्यापैकी १२६ विद्यार्थी पास झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

प्रशालेतील प्रथम तिन क्रमांक या प्रमाणे प्रथम कु . पतंगे संचिता सचिन ९०.०० टक्के, दुसरा क्रमांका मध्ये दोन विद्यार्थ्यांना समान टक्केवारी मिळाली कु. डोंबे सृष्टी नागनाथ ८९.६० टक्के,तर धांडोरे अथर्व कैलास ८९.६० तिसरा क्रमांक कु. जाधव भक्ती बालाजी ८९.४० टक्के मार्क मिळाले
या विद्यालयाचे सन २०२४-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेला एकुण १३४ विद्यार्थी बसले त्यापैकी १२६ उत्तीर्ण झाले या परिक्षेला विशेष श्रेणी मध्ये २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत ४२ , द्वितीय श्रेणी मध्ये ४४ , तृतीय श्रेणी मध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकुण १३४ पैकी ८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले प्रशालेचा एकुण निकाल ९४.०४ टक्के लागला यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कुल कमिटचे
व्हा चेअरमन अॅड पृथ्वीराज राजेमाने, माजी नगराध्यक्ष विजय धट, नितीन दोशी, चैतन्य देशमाने, अमोल राऊत, , शिवराज राजेमाने, संभाजी माने, विपुल दोशी,
प्रशालेचे प्राचार्य प्रविण दासरे, उपमुख्याध्यापक यादव,परिक्षेचे केंद्र प्रमुख दिलीप माने,प्रविण बोते सर, शशिकांत,म्हमाणे सर, संतोष देशमुख, महादेव नलवडे, प्रतिक ओतारी,अमोल म्हेत्रे सह विषय शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले

विद्यार्थ्यावर अपेक्षेचे ओझं लादू नका- सुलोचना बाबर

देवापूर येथे ३० वर्षांनंतर भेटले कृष्णा सुदामा

तब्बल ३० वर्षांनी जपले ऋणानुबंध

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील १९९४-९५ बॅचचा स्नेहमेळावा

▲ देवापूर, दि. १७ : कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शनिवारी तब्बल ३० वर्षांनी ऋनानुबंध जपले. हा स्नेहमेळावा म्हणजे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… असाच होता.

कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दहावीतील सन १९९४_९५ सालातील वर्ग मित्र-मैत्रिर्णीचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.हा मेळावा 105 विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सध्याचे प्राचार्य तुकाराम माने सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी सर्व शिक्षकांना फेटा ,शाल, स्मृतिचिन्ह व उपस्थितांची फोटो फ्रेम प्रदान करण्यात आली.

तत्कालीन दहावीचे मित्र व मैत्रिणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यावेळी तब्बल …… जणांनी उपस्थिती लावली. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या
आठवणी जाग्या झाल्या. अनेकांना यावेळी गहिवरून आले.कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून या स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांना ग्रुपवर संघटित करून या मेळाव्याच्या चर्चा घडवून हा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या तत्कालीन विद्यार्थी व विद्यार्थिनीनी या स्नेहमेळाव्याचे नेटके आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्यासाठी तत्कालीन गुरुजनांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये माजी प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक क्लार्क,शिपाई , लॅब असिस्टंट आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अनेक वर्षांनंतर सर्व वर्ग मित्र मैत्रिणी एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा व ओळख परेड, तसेच स्नेहभोजन व शाळेविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठक्करबाप्पा वसतिगृहातील चिमुकल्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले. माजी विद्यार्थ्यांनी वॉटर अक्वॉ फिल्टर शाळेला प्रदान केले.त्याच बरोबर शाळा परिसरात ठिबक करून वृक्षारोपण करण्यात आले.

मेळाव्याच्यानिमित्ताने आपली मनोगते व्यक्त करताना आमच्या मातृभूमीविषयी व या शाळेविषयी सार्थ अभिमान आहे. येथील विद्यार्थी आणि लोकांनी आम्हाला मानसन्मान दिला. भविष्यकाळात या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्ही सदैव करू अशी ग्वाही उपस्थित शिक्षक मान्यवरांनी दिली. या स्नेहमेळाव्यात शाळा प्रशासनाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास विद्यालयाचे माजी प्राचार्य, मगदूम डी. एन, अजीव सदस्य बनगर एस जी, माजी मुख्या. पवार ए. एन.,(अंबादास), फडतरे सी जी, साठे पी .एन .सर कदम एन. एन., कदम व्ही. एम., उपस्थित होते.
माजी शिक्षक म्हणून निप्रुळ एल.व्ही,प्रा. लेंगरे एस बी,, शिंदे यु. ए. सर उत्तम मोरे सर, वसंत शिरकांडे सर, बुद्रुक सर, कोकाटे सर, सूर्यकांत कांबळे सर , कोडलकर सर, वाघमोडे सर, मदने सर, पिंगळे सर, व लेखनिक शेंडे सर, नरळे सर, इत्यादी सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी गेली दोन महिने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

Show quoted text

सोनम बोटे चे उज्वल यश, भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती व एन एसएसई स्पर्धा परीक्षेत अव्वलस्थानी

वडूज प्रतिनिधी- विनोद लोहार

वडूज: सातेवाडी ता.खटाव येथील सुकन्या व सेवागिरी इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु.सोनम जितेंद्र संकपाळ (बोटे ) हिने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती व एन एसएसई स्पर्धा परीक्षेत अव्वलस्थानी येण्याचा मान पटकावला.कु.सोनम जितेंद्र संकपाळ (बोटे ) हिने एन एसएसई स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र राज्यात इयत्ता तिसरी मध्ये २०० पैकी १८२ मार्क्स मिळवून दहावा क्रमांक पटकावला. तर भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा शैक्षणिक वर्षात सातारा जिल्ह्यात८० टक्के मार्क्स मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
‌‌. तिच्या या उज्वल यशाबद्दल पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सातेवाडी ग्रामस्थ आणि सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

अभिनेत्री विजया बाबर हिचा क्रांतीवीर संकुलात सन्मान


म्हसवड…प्रतिनिधी
छोट्या पडद्यावर अनेक मालिकेमध्ये नावलौकिक मिळवलेल्या माण तालुक्यातील देवापूर गावची सुकन्या विजया उर्फ बयो आनंदा बाबर हिचा नुकताच म्हसवड येथे सत्कार करण्यात आला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे संस्थेच्या सचिव मुख्याध्यापिका सुलोचना विश्वंभर बाबर यांचे हस्ते टीव्हीवरील अनेक मालिकेत नावलौकिक मिळविलेल्या विजया आनंद बाबर या सिनेतारिकेचा सत्कार नुकताच क्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे करण्यात आला. विजया बाबर यांचे वडील आनंदा बाबर व कुटुंबीयांचा सत्कार संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सिनेतारिका विजया बाबर म्हणाली जीवनात उच्च ध्येय ठेवा. त्याला प्रयत्नाची जोड द्या. जिद्दीने संघर्ष केल्यास यश तुमचेच असेल. यापुढील कालावधीत कलाक्षेत्राला मोठा वाव असून ग्रामीण भागातील अनेक मान्यवरांनी या क्षेत्रात नाव कमविल्याचे तिने सांगितले. हम भी कुछ कम नही हे दाखवून देण्याची उर्मी ग्रामीण कलाकारांमध्ये असल्याचे तिने सांगितले. आई वडिलांची प्रेरणा तसेच गुरुजनाच्या मार्गदर्शनामुळे आपण यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असल्याचे विजया ने सांगितले. स्वामी समर्थ तसेच छोट्या बयो ची मोठी स्वप्ने या मालिकेने आपल्याला सामान्य रसिकांच्या घराघरात पोहोचवल्याचे सांगून क्रांतिवीर संकुलाच्या सर्वांगीण प्रगती बद्दल विजया बाबर हिने समाधान व्यक्त केले.
प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रस्ताविक करून विजया बाबर हिच्या सिने कलाक्षेत्रातील कार्याचा गौरव केला.
यावेळी प्राचार्य विन्सेंट जॉन , कौस्तुभ बाबर व सौ बाबर , तसेच सिनेतारिका विजया बाबर हिचे कुटुंबीय उपस्थित होते.

सिने तारिका विजया बाबर उर्फ बयो चा क्रांतिवीर संकुलात सन्मान.
error: Content is protected !!