Advertisement

म्हसवड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,1 लाख 72 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 7 आरोपींना केली अटक.

म्हसवड वार्ताहर

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वरकुटे म्हसवड येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून 1 लाख 72 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 7 आरोपींना केली अटक केली आहे

सविस्तर हकीकत
मौजे वाकी वरकुटे तालुका माण गावचे हद्दीत बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराचे आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैंज म्हणून जुगार खेळत असले बाबत गोपनीय माहिती मिळाल्यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वाकी वरकुटे येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एक लाख 72 हजार 290 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

या गुन्ह्यातील आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.

सर्व समाजासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करा- ना.जयकुमार गोरे

म्हसवड :- वृत्तसेवा
संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते. त्यांच्या महान कार्याचा वारसा शिंपी समाज एकत्र होऊन पुढे नेत आहे ही बाब निश्चितच प्रेरणादायी असून इंजि. सुनील पोरे यांच्या माध्यमातून हा समाज एक संघ झाला आहे आगामी काळात इंजि.पोरे यांनी सर्वच समाजांतील घटकांसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून कार्य करावे तसेच आपण शिंपी समाज व पोरे कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे उद्गार ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी काढले
म्हसवड येथे समस्त शिंपी समाज पोरे परिवार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी नामदेव समाज परिषदेचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे राज्याध्यक्ष संजय नेवासकर पंढरपूर केशवराज संस्थेचे अध्यक्ष बाळ आंबेकर म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करत आहे. तसेच शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे ते लवकरच मार्गी लागेल आणि त्या माध्यमातून शिंपी समाजातील तरुणांना भविष्यात उद्योग व्यवसाय करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही
संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होऊन गेले आहेत त्यांच्या विचारांचा महान वारसा चालवण्याचे काम समस्त शिंपी समाज एकत्र होऊन करत आहे ही बाब अतिशय प्रेरणादायी आहे असेच एकत्र राहून आपल्या समाज बांधवांचा विकास व्हावा यासाठी नामदेव समाज परिषद अत्यंत तळमळीने काम करत आहे. इंजिनीयर सुनील पोरे ज्या ज्या वेळी भेटत असतात त्या त्या वेळी शिंपी समाजाचे काम सांगितले नाही असे कधीच होत नाही. नामदेव समाज परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पायाला भिंगरी बांधून शिंपी समाजाची मोट बांधण्याचे काम केले असून त्याचाच परिणाम आज समस्त पोरे बांधव स्नेह मेळावा होत आहे यातून त्यांच्या कार्याची ओळख होत आहे मात्र यापुढील काळात त्यांनी सर्व जाती धर्मांच्या उन्नतीसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करावे आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दिला
यावेळी नामदेव समाज परिषदेचे राज्य अध्यक्ष संजय नेवासकर म्हणाले शिंपी समाजाला नामदेव महाराजांचा मोठा वारसा लाभला आहे आम्ही नामदेव समाज परिषदेच्या माध्यमातून शिंपी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी कार्य करत राहू असे सांगितले
इंजि. सुनील पोरे यावेळी बोलताना म्हणाले की राज्यातील समस्त पोरे बांधव आज म्हसवड मध्ये एकत्र येऊन स्नेह मेळावा घेतल्याने मनस्वी मोठा आनंद होत आहे नामदेव समाज परिषद ही सन १९०७ मध्ये स्थापन झाली आहे तेव्हापासून या परिषदेचे कार्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुरू आहे नामदेव महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन ही संघटना कार्य करत आहे रेल्वेची जागा मिळवण्यासाठी या परिषदेने खूप प्रयत्न केले असून मुंबई दिल्ली वारी केल्या आहेत या कामासाठी नामदार जयकुमार गोरे यांची मोलाची मदत झालेली आहे. मात्र काही जण पोकळ वल्गना करून श्रेय लाटण्याचे काम करत आहेत
तसेच नामदार गोरे यांच्या माध्यमातून शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले असून आपण स्वतः या कामासाठी पुढाकार घेऊन हे महामंडळ सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. पंढरपूर येथे होत असलेल्या नामदेव समाज स्मारकासाठी योग्य ते स्थान मिळावे अशी मागणी यावेळी पोरे यांनी ना. गोरे यांच्याकडे केली
या स्नेह मेळाव्यामध्ये माण- खटाव तालुक्याच्या दुष्काळ मुक्तीचा विडा उचलून या दुष्काळी भागाला पाणी देण्याचे पुण्य कर्म केलेल्या ना. जयकुमार गोरे यांना समस्त पोरे परिवाराच्या वतीने मानपत्र देऊन भव्य असा सन्मान करण्यात आला तसेच शिंपी समाजातील वैभव पोरे वृषाली तूपसाखरे उषाताई पोरे यांनी अतिशय उल्लेखनीय समाजकार्य केल्याबद्दल त्यांना समाजाच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राज्यातील कानाकोपऱ्यातून समस्त पोरे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. पोरे यांनी केले आभार करणभैया पोरे आणि मानले

घिगेवाडीत गिरवले विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे. जिल्हा परिषद शाळेच्या स्तुत्य उपक्रमामुळे कौतुकांचा वर्षाव.

पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे

घिगेवाडी ता. कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेने मुलांच्या व्यवहार ज्ञानात व बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी यासाठी शाळेच्या पटांगणात भरवला चिमुकल्यांचा बाल बाजार.
अश्या या आगळ्यावेगळ्या चिमुकल्यांच्या बाल बाजाराचे उद्घाटन शालेय कमिटी अध्यक्ष रोहित सावंत यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला “फुड फेस्टिव्हल-भाजी मंडई ” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नव्हे तर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे. या चिमुकल्यांच्या बाल बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या,चायनीज भेळ, ईडली,मंचुरियन,विविध प्रकारच्या डाळी,घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ,खाद्यपदार्थांमध्ये पॅटीस,भेल सेंटर,वडापाव,पाणीपुरी,भजी-चहा,अशा दुकानांचा यात समावेश होता. बाल बाजारात ग्रामस्थ, पालक महिला बचत गटाच्या सदस्य यांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची तसेच पालेभाज्यांची खरेदी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यामुळे पालक वर्गातून हे समाधान व्यक्त होत होते.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन व बुद्धिस चालना मिळते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते. अशा प्रतिक्रिया खरेदीस आलेल्या पालक वर्गातून येत होत्या. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी घिगेवाडीचे आदर्श सरपंच नारायण सावंत, शिक्षिका सारिका ननावरे,सुधीर सावंत अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन,आदिनाथ सावंत यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भरवलेल्या बाल बाजाराबाबत मनोगतं व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक संजय काळे सरांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाचे सदस्य, शालेय कमिटी सदस्य, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो ओळ :- घिगेवाडी ता. कोरेगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भरवलेल्या बालबाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला व ग्रामस्थांची गर्दी.

माधवराव पाटील महाविद्यालयात व्याख्यानाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी 


मुरूम, ता. ६ (बातमीदार) :  येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सोमवारी ( ता.६ ) रोजी व्याख्याने उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा उस्मानाबाद, मुरूम शहर पत्रकार संघ व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व प्रतिपादन करताना पत्रकार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधन करून देशहित, राष्ट्रप्रेम जपले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांची लेखणी करते. असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुशिल मठपती, महेश निंबरगे, रवी अंबुसे, अमोल गायकवाड, विशाल देशमुख, जगदीश सुरवसे, माजी तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे, नाहीरपाशा मासूलदार, हुसेन नुरसे, डॉ. शिला स्वामी, प्रा. नारायण सोलंकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. भीमाशंकर पांचाळ, योगेश पांचाळ, नामदेव भोसले, अमोल कटके, मनोज हावळे, किशोर कारभारी, अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, महेश मोटे, सुधीर पंचगल्ले, महेश निंबरगे सह पत्रकार बांधव, कर्मचारी वृंदासह उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.

टिसीएस कंपनीकडून टोकण दर्शन प्रणालीचा प्रस्तावास मंजुरी


सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
* कार्यालयीन कामकाजाच्या सुलभतेसाठी व भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने
शिर्डी व शेगाव देवस्थानचा अभ्यास दौरा

        
 पंढरपूर (ता.10) :- श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या भाविकांचे सुलभ व वेळेत दर्शन व्हावे यासाठी तिरूपती व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकण दर्शन पध्दती राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टिसीएस कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर सदर कंपनीने मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजुर केला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
                    श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. बैठकीस मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व मंदीर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
     यावेळी  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जिर्णोद्वार कामाचा आढावा घेऊन कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत अशा सुचना पुरातत्व विभाग व संबधित ठेकेदारास देण्यात आल्या. तसेच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर मालमत्ता अधिकारी नियुक्त करणे, श्री क्षेत्र आळंदी येथे मंदिर समितीसाठी जागा उपलब्ध करून घेणे, सन 2025 मधील श्रींच्या पुजा ऑनलाईन बुकींग करणे, रक्षक सिक्युरिटी कंपनी विषयी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना अंतिम नोटीस देणे, मंदिरातील निर्माल्यापासून धुप - अगरबत्ती तयार करणेबाबत थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज, पुणे यांनी कोणत्याही स्वरूपाची कार्यावाही न केल्याने प्रस्ताव रद्द करून ऋषिकेश भट्टड, पंढरपूर यांचा प्रस्ताव योग्य त्या अटी व शर्तीवर मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
          तसेच अनंत अरूण माळवदकर, गुरूदत्त अभिमन्यू क्षिरसागर, संकेत अशोक कोले, स्नेहा अमोल वाडेकर इत्यादी कर्मचा-यांना अनुकंपा तत्वावर मंदिर समितीमध्ये नोकरी देऊन नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास येथील उपहारगृहाचे भूमिपूजन करण्यात आले व दैनंदिनी 2025 चे प्रकाशन देखील करण्यात आले. तसेच कार्यालयीन कामकाज गतीमान करण्याच्या दृष्टीने विविध संगणक प्रणाल्या टिसीएस कंपनीकडून मोफत उपलब्ध करून घेणे व महाराष्ट्र राज्यातील शिर्डी व शेगांव देवस्थाने ही प्रसिध्द देवस्थाने आहेत. या देवस्थान मधील कार्यालयीन कामकाज, कामकाजासाठी केलेल्या अत्याधुनिक साधनांचा  वापर, भाविकांना देण्यात येणा-या सेवा सुविधांची माहिती घेण्यासाठी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील अधिकारी, पदाधिकारी व वरिष्ठ कर्मचा-यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

इंजिनीयर सुनील पोरे यांच्या हस्ते कराड बैकेतर्फे कर्जदार ग्राहकांना वाहन चावी प्रदान

म्हसवड (वार्ताहर)

इंजिनीयर सुनील पोरे यांच्या हस्ते कराड बैकेतर्फे कर्जदार ग्राहकांना वाहन चावी प्रदान करण्यात आले यावेळी
इंजिनीयर सुनील पोरे यांचा कराड अर्बन बँक.शाखा म्हसवड यांचे वतीने नामदेव समाज भूषण पुरस्काराबद्दल बँकेचे वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी अंकुश अब्दागिरे ,आप्पा पुकळे, शंकर विरकर, अजिम तांबोळी, सदाशिव सावंत, पोपट बनसोडे, बाबु मुल्ला, मनोहर गलंडे, बँक मॅनेजर वायदंडे, माळवे ,गणेश राऊत , अधिकारी खाडे उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब पिसे यांना थार गाडी,चरण माने-थार गाडी,भोकरे-पिकअप, खांडेकर-किया गाडी चे वितरण करण्यात आले.
यावेळी सुनील पोरे यांचा नामदेव समाज भूषण पुरस्कार मिळाले बद्दल बँकेवतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अंकुश अब्दागिरे आप्पा पुकळे यांची भाषणे झाली
सत्काराला उत्तर देताना इंजिनीयर सुनील पोरे म्हणाले, म्हसवड परिसरातील व्यापारी व शेतकरी यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी कराड बैकेचे उल्लेखनीय कार्य केले आहे. नफा हा उद्देश न ठेवता. बैंकेने या परिसरातील लोकांची गरज पाहून कर्ज वितरण केले आहे.
येथील अधिकारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बैकेने केलेला सत्कार हा अविस्मरणीय आहे. असे ते म्हणाले..
प्रास्ताविक वायदंडे केले. आभार गणेश माळवे यांनी व्यक्त केले..

तंत्रशुद्ध पद्धतीने धावाल तरच आयुष्याची गाडी निरोगी धावेल : अश्विन बोटे

▪️ मैत्री रन टी शर्ट अनावरण कार्यक्रम वडूज येथे संपन्न
▪️ रविवार दि. १ रोजी भव्य मॅरेथान स्पर्धा





वडूज/प्रतिनिधी : विनोद लोहार

वडूज: एकविसाव्या शतकातील जीवन शैली पूर्णपणे बदललेली असून मानवाची प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मात्र मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमुळे जीवनाचा कायापालट होऊ शकतो. तंत्रशुद्ध पद्धतीने धावाल तर आणि तरच आयुष्याची गाडी निरोगी धावेल असे प्रतिपादन अश्विन बोटे यांनी केले.
येथील यशंवत सभागृहात मैत्री कला , क्रिडा व सांस्कृतीक मंडळाच्या वतीने ‘ मैत्री रन – २०२४ ‘ मॅरेथॉन स्पर्धेच्या टी शर्ट अनावरण प्रसंगी बोटे बोलत होते. यावेळी अध्यक्ष नरेंद्र गोडसे , डॉ. अजित इनामदार , शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, डॉ . सुधीर पवार, डॉ.दयानंद घाडगे, प्रशांत सरनोबत, सुरज कचरे , यांची प्रमुख उपस्थिती होती .
डॉ. महेश काटकर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले कि , वडूज शहराला ऐतिहासीक वारसा असून येथील विविध सामाजीक संस्था , आरोग्य , पर्यावरण आणि स्वच्छता याबाबत नेहमीच सतर्क असतात. शहर व परिसरातील लोकांचे राहणीमान व आरोग्यदायी व्यायाम यासाठी विविध संकल्पना द्वारे समाजहित जोपासले गेले आहे . चालणे, धावणे आणि सायकलींग या व्यायाम प्रकारा मुळे जीवन शैलीत बराच फरक पडतो असेही डॉ. काटकर म्हणाले. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, डाँ .सुधिर पवार , डाँ.शंतनू पवार,डाँ . दयानंद घाडगे, धावपटू जयंत शिवदे ,सुरज कचरे,प्रशांत सरनोबत आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली.
उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचलन अँड. अनिल गोडसे यांनी तर आभार राजकिरण लंगडे यांनी मानले.या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक , सहप्रायोजक , नगरसेवक अभयकुमार देशमुख, जयवंत गोडसे, डॉ. प्रविण चव्हाण , डॉ . सुरेश कोळेकर, डॉ .चंद्रशेखर नांगरे , डॉ. धनंजय खाडे , डॉ. कुंडलीक मांडवे ,श्रीनिवास कदम , डाँ . हनुमंत मासाळ, अमित दळवी, संतोष कुलकर्णी , डॉ. प्राजक्ता काटकर , डॉ . जयश्री मासाळ, डॉ. रुपाली मुळे, सदाशिव बागल, शीतल गोडसे, सरिता घार्गे,डॉ. निता इनामदार , गोविंद भंडारे, मनोज राऊत, संतोष शहा आदिंसह मैत्री कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते .

चौकट …
रविवार दि. १ डिसेंबर रोजी मैत्री रन – २०२४ . .
वडूज येथे रविवार दि. १ डिसेंबर रोजी महिला व पुरुष यांचेसाठी १० व ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे . आकर्षक बक्षिसांसह टी शर्ट, मेडल , बीआयबी , अल्पोपहार , सर्टिफिकेट मिळणार आहे. तरी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले .

फोटो ..

वडूज येथे मैत्री रन – २०२४ टी शर्ट अनावरण प्रसंगी मान्यवर( छाया : विनोद लोहार)

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी रथयात्रा नियोजन बैठक संपन्न,

म्हसवड वार्ताहर

म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी रथयात्रा 2डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्ताने सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार महेश आहिर, म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी सचिन माने,आरोग्य विभाग कर्मचारी, एसटी महामंडळ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी,ग्रामस्थ, पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, यांचेसह
श्रीमंत गणपतराव राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत अँड.पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने, श्रीमंत दिपसिंह राजेमाने, श्रीमंत विश्वजित राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने , इंजिनीयर सुनील पोरे,श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी वैभव गुरव,अकिल काझी, युवराज सुर्यवंशी,आदी मानकरी व माळी, लोहार, सुतार, व बारा बलुतेदार मानक-याच्या उपस्थितीत होते.

यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, म्हसवड येथील येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा देण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे, म्हसवड ग्रामस्थांनी ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
पोलीस व ग्रामस्थांनी समन्वयाने काम करुन यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करावेत, वीज, पाणी व स्वच्छता विभाग यासाठी नगरपालिका व शासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे.
कोणत्याही कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी चोख काम करावे. यात्रेची सुसंस्कृत परंपरा जपावी, असे ते म्हणाले.
…..

महाबळेश्वर येथे संविधान दिन साजरा

माणदेशी न्यूज : मिलींद काळे
महाबळेश्वर (सातारा)
२६ नोव्हेंबर हा भारतीय इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. १९४९ मध्ये या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ संविधानाचा सन्मान करण्याचा आहे. तसेच त्याच्या तत्त्वावर विचार करण्याचा आणि भारतीय लोकशाहीला सशक्त करण्याचा आहे.
महाबळेश्वर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड,समता सैनिक दल रघुनाथ घाडगे, भीम क्रांती युवक संघटना संतोष भालेराव, वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव अनिल सकपाळ, रामचंद्र कदम ,अभिजीत भालेराव, शाम तांबे, जगन कदम, संतोष जाधव, प्रकाश सपकाळ, महेश सपकाळ, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा साताराचे फणसे सर व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

*II “श्रीराम जय राम जय जय राम” ll*

*🚩श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर 🚩*

*🌸 प्रवचन – २२ नोव्हेंबर 🌸*

*देव अत्यंत दयाळू आहे.*

तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो ! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात ? परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का ? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का ? याचा विचारच आपण फारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले ? असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण तो ‘ देवाने वाईट केले ’ असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कुणाचेही दु:ख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दु:ख, कष्ट झालेले आवडेल ? म्हणून, देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका.

द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दु:शासनाने भरसभेत खेचले, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दु:शासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दु:शासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले, आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य ! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली, आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली; आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली. पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की, “ आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास ? तो दुष्ट, केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास ? ” तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, “ त्यात माझा काय दोष ? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. ” जगाची आशा, आसक्ति, सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल ? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का ? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.

*३२७. सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो.*

error: Content is protected !!